Wednesday, June 26, 2024

अखेर ठरलंच…! ‘हीच’ होणार वरुण धवनची कारभारीण, करिनाने सांगितले ‘नाव’

वरुण धवन आणि नताशा दलाल यांचे नाते काही नवीन नाही. बऱ्याचवेळा वरुण आणि नताशाला एकत्र पहिले जाते. वरुणने करणच्या शो मध्ये त्याच्या आणि नताशाच्या नात्याबद्दल सांगितले होते. नुकताच वरुण त्याच्या कुली नं १ सिनेमाच्या प्रमोशनसाठी करीनाच्या ‘व्हॉट विमेन वॉन्ट’ या कार्यक्रमात आला होता. तेव्हा त्याने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या.

वरुण सध्या कुली नं १ च्या प्रमोशन मध्ये व्यस्त आहे. त्याच निमित्ताने तो करीनाच्या लोकप्रिय शो ‘व्हॉट विमेन वॉन्ट’ मध्ये पोहचला. त्यावेळी करीनाने नताशाचा वरुणची भावी बायको म्हणून उल्लेख केला. यावेळी वरुणने त्याच्या लग्नाबद्दल अनेक गोष्टी उघड केल्या. त्याने नताशा सोबत नात्यात असल्याचे सांगत, तो आणि नताशा शाळेपासून सोबत १२ वी पर्यंत सोबत असल्याचे सांगितले. वरुणने नताशाला बास्केटबॉल कोर्टवर पहिले आणि तो तिच्या प्रेमात पडला.

Varun & Natasha
Varun & Natasha

मागील वर्षाच्या नोव्हेंबर मध्ये या दोघांनी गुपचूप साखरपुडा देखील उरकला आहे. नताशा आणि वरुणाला लिव्ह इन रिलेशन मध्ये राहायची खूप इच्छा होती. नताशाच्या घरून लिव्ह इन साठी तसा फारसा विरोध नव्हता, मात्र वरुणच्या घरच्यांना वरुणने लग्न करून स्थिर व्हावे अशी इच्छा होती.

वरुणने पुढे सांगितले, “मी जेव्हा माझ्या भावाला आणि वहिनीला सोबत बघतो, तेव्हा मला लग्न करण्याची इच्छा झाली. लग्न करण्याचे अजून एक कारण म्हणजे माझी पुतणी तिला बघितल्यावर मला माझे लग्नानंतरचे भविष्य दिसते. मी माझे स्वतःचे घर घेतले आहे, त्यामुळे आता तर माझ्या घरच्यांनी मी लवकर लग्न करावे यासाठी माझ्यामागे तगादाच लावला आहे. अशा करतो की लवकरच माझे लग्न होईल.”

वरुण आणि नताशाचे अनेक फोटो सोशल मीडियावर वायरल होत असतात. हे कपल अनेक लग्न, पार्ट्या, हॉलिडे सोबत एन्जॉय करताना दिसत असतात. वरुण लवकरच कुली नं १ मध्ये दिसणार आहे. हा सिनेमा येत्या २५ डिसेंबरला अमेझॉनवर प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात वरुणसोबत सारा अली खान मुख्य भूमिकेत दिसेल.

हे देखील वाचा