बाबो! ‘सीता’ची भूमिका साकारण्यासाठी करीनाने मागितले ‘एवढे’ कोटी; आकडा वाचून फिरतील डोळे

Kareena Kapoor Khan demand crores rupees for mythological role of sita


बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान या दिवसात खूप चर्चेत आहे. ती सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते, त्यामुळे ती चर्चेत असते. मात्र, या वेळेस तिचे चर्चेत राहण्याचे कारण वेगळे आहे. करीनाला एका पौराणिक चित्रपटात काम करण्याची ऑफर आली आहे, पण तिला यामध्ये सीतेचे पात्र निभावण्यासाठी जास्त रक्कम हवी आहे. निर्मात्यांनी या पात्रासाठी तिला कॉल केला, पण तिची मागणी ऐकून ते देखील हैराण झाले.

माध्यमातील वृत्तानुसार, त्यांच्या चित्रपटाबाबत बोलताना निर्मात्यांनी सांगितले की, सीतेचे पात्र केंद्रस्थानी ठेवून ते रामायण पुन्हा एकदा बनवणार आहेत. या चित्रपटातील सीता या पात्रासाठी करीना कपूर ही त्यांची पहिली निवड आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, करीना कपूर आधी तिच्या चित्रपटासाठी 6-7 कोटी रुपये घ्यायची, पण ती आता या पात्रासाठी 12 कोटी मागत आहे. या चित्रपटाची तयारी आणि शूटिंगसाठी 8 ते 10 महिन्यांचा कालावधी लागणार आहे. यादरम्यान तिच्याकडे दोन चित्रपट आहेत. ती ‘वीरे दि वेडिंग 2’ आणि हंसल मेहताच्या एका चित्रपटात काम करणार आहे. या दोन चित्रपटाची शूटिंग पूर्ण झाल्यावर ती पौराणिक चित्रपटाच्या शूटिंग करेल. परंतु या गोष्टीची अजून कोणतीच अधिकृत घोषणा झाली नाही.

करीनाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, ती लवकरच आमिर खान सोबत ‘लाल सिंग चड्डा’ या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट ‘फॉरेस्ट गंप’चा हिंदी रिमेक असणार आहे. यामध्ये करीना कपूर खान ही मुख्य भूमिकेत असणार आहे. या सोबतच ती करण जोहरच्या ‘तख्त’ या चित्रपटात देखील दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.