व्हिडिओ: शिल्पा शेट्टीच्या वाढदिवशी पती राज कुंद्रा झाला रोमँटिक; म्हणाला, ‘तुझ्याशिवाय मी कुणीच नाही…’


बॉलिवूडची सर्वात फिट आणि सुंदर असणारी अभिनेत्री शिल्पा शेट्टी मंगळवारी (८ जून) तिचा ४६ वा वाढदिवस साजरा करत आहे. शिल्पाने अभिनयासोबतच तिच्या डान्स, फिटनेस, कुकिंग आदींच्या माध्यमातून फॅन्सला आणि इंडस्ट्रीमधील लोकांना देखील वेड लावले आहे. वयाच्या ४६ व्या वर्षी शिल्पाचा इतका फिटनेस पाहून भल्या- भल्यांना तिचा हेवा वाटत असतो. आज शिल्पाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिला सोशल मीडियावर असंख्य शुभेच्छांचे मेसेज येत आहे. फॅन्स, कलाकार आदी सर्वच शिल्पाला शुभेच्छा देताना दिसत आहे. या सर्वांमध्ये एका व्यक्तीच्या शुभेच्छेने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

आज शिल्पाला अनेक मेसेजेस येत असलतील यासर्वांमधे तिच्या पतीकडून राज कुंद्राकडून मिळालेल्या हटके आणि अतिशय सुंदर शुभेच्छा तिच्यासाठी खास असणार आहे. शिल्पाला शुभेच्छा देताना राजने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एका व्हिडिओसह सुंदर मेसेजही शेअर केला आहे. जो पाहून आपल्याला या दोघांमधील प्रेमाचा अंदाज येऊ शकतो.

राजने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये शिल्पा आणि राज यांनी सोबत घालवलेले अनेक चांगले क्षण दिसत आहेत. यात व्हॅकेशन, पार्टी, कुटुंबासोबत घालवलेले क्षण आदी अनेक विविध फोटो आणि काही अगदी छोटे व्हिडिओ एकत्र करून हा एक रोमँटिक व्हिडिओ तयार केला आहे. मुख्य म्हणेज या व्हिडिओमध्ये त्याने आशिकी २ मधील ‘तुम ही हो’ हे गाणे देखील बॅकग्राऊंडला टाकले आहे.

हा व्हिडिओ पोस्ट करताना त्याने लिहिले की, “हे गाणे, गाण्याचे बोल आणि हा व्हिडिओ माझ्या मनातील सर्व भावना व्यक्त करत आहे. तुझ्याशिवाय मी कोणीच नाही, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, माझी स्वप्नपरी.” राजच्या या शुभेच्छांवर शिल्पाने उत्तर देत लिहिले की, “माय कुकी राज कुंद्रा. लव यू टू द मून अँड बॅक.”

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होता असून, यावर फॅन्ससोबतच कलाकार देखील शिल्पाला शुभेच्छा देत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.