अभिनेत्री करीना कपूर खान सध्या तिच्या लहान मुलाच्या नावामुळे बरीच चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वीच बेबो आणि सैफ मुलगा जेहसोबत आजोबा रणधीर कपूरच्या घरी पोहोचले होते. जिथे त्यांनी मीडियापासून जेहचा चेहरा अजिबात लपवला नाही. त्यानंतर त्यांचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. दरम्यान एचटी ब्रंचला करीनाने मुलाखत दिली होती. तेव्हा करीना म्हणाली की, तो जेमतेम सहा महिन्यांचा आहे, पण जेह अगदी माझ्यासारखा दिसतो आणि तैमूर सैफसारखा दिसतो.
‘जेह आणि तैमूर पूर्णपणे वेगळे आहेत’
या मुलाखतीत करीनाने सांगितले की, “जेव्हा तैमूर सहा महिन्यांचा होता तेव्हा तो नवीन व्यक्ती पाहिला की रडायचा, पण जेह तसा अजिबात नाही. तो नवीन व्यक्तीमध्ये सहज मिसळतो. तैमूर हा सैफसारखाच आहे आणि जेह त्याच्यापेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. तैमूर एक वैशिष्ट्यपूर्ण धनुर्धर आहे. तो सर्जनशील आहे, त्याला कला, रंग आणि रेखाचित्र आवडतात. त्याला नवीन गोष्टी शोधायला आवडतात. तर जेह पिसियन आहे. आता बघू तो कसा विकसित होतो.”
करीनाने गरोदरपणात शूट केला हा चित्रपट
करीना कपूरने नोव्हेंबर २०१६ मध्ये तैमूरच्या वेळेस ८ महिन्यांची गरोदर असताना, एचटी ब्रंचसोबत पहिले मॅटर्निटी फोटोशूट केले होते. असे करणारी ती पहिली बॉलिवूड अभिनेत्री होती. तिने तिच्या दोन्ही प्रेग्नेंसीदरम्यान जाहिरातीमध्ये काम केले आहे. ती म्हणते की, “जेहच्या वेळी जेव्हा मी माझ्या पाचव्या महिन्यात होते, तेव्हा मी ‘लाल सिंग चड्ढा’साठी आमिर खानसोबत रोमँटिक नंबर शूट करत होते.”
‘जेह आणि तैमूरने अभिनेता बनू नये’
करीना पुढे म्हणाली की, “माझ्या दोन्ही मुलांनी चांगला व्यक्ती बनावे, मला असे वाटते. लोकांनी त्यांना सुशिक्षित आणि दयाळू असे म्हटले पाहिजे. त्यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकावे असे मला अजिबात वाटत नाही. जर तैमूर माझाकडे येऊन मला म्हणाला, की मला दुसरे काहीतरी करायचे आहे. हे ऐकून मला खूप आनंद होईल. एव्हरेस्ट चढणे ही त्याची निवड असेल, तरी मी त्याला प्रत्येक गोष्टीत साथ देईन.”
मला जास्त लक्ष देणारी आई व्हायचं नाही
करीना सांगते की, तिला जास्त लक्ष देणारी आई व्हायची इच्छा नाही. ती म्हणते, “मला हेलिकॉप्टर आईसारखे व्हायचे नाही. माझी इच्छा आहे की त्यांनी प्रत्येक गोष्ट ही स्वतः करावी. इतकेच नव्हे, तर त्यांच्या अनुभवातून त्यांनी जीवनाचे धडे घेतले पाहिजेत. कारण माझ्या आईने मला तेच शिकवले आहे. माझी आई अशी होती की, तुम्हाला जे पाहिजे ते करा, चुका करा आणि नंतर त्या सुधारण्यास शिका, कारण तेच आयुष्य जगायला शिकवते.”
‘सैफ मला नेहमी चिडवतो’
त्याचबरोबर करीनाने असे ही सांगितले की, जेव्हा ती पॅपराझीसाठी पोज देते, तेव्हा सैफ अनेकदा तिची खिल्ली उडवतो. तो तिला चिडवून म्हणतो की, आई आनंदाने फोटोसाठी पोज देत असताना, मुले त्यांच्या आईची पोज पाहतात आणि तिच्या पावलावर पाऊल टाकतात.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-ही आहे हॉलिवूडमधील सर्वाधिक श्रीमंत कलाकारमंडळी, संपत्तीचा आकडा पाहून तुम्हीही व्हाल दंग