Monday, April 15, 2024

‘क्रू’चे धमाकेदार ‘घाघरा’ गाणे रिलीज, करीना-तब्बू-क्रितीच्या डान्स मूव्ह्सने लावली आग

बॉलीवूडच्या आगामी ‘क्रू’ चित्रपटात करीना कपूर खान, (Kareena kapoor) क्रिती सेनन आणि तब्बू यांना पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. चाहत्यांची उत्कंठा द्विगुणित करण्यासाठी निर्मात्यांनी चित्रपटाचे नवीन गाणे ‘घाघरा’ रिलीज केले आहे.

या धमाकेदार गाण्यात तिन्ही अभिनेत्री सुंदर अन्दाजात दिसत आहेत. हे गाणे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. गाण्यात तिन्ही अभिनेत्री क्लबमध्ये जोरदार पार्टी करताना दिसत आहेत. हे गाणे यंदाचे हिट पार्टी साँग ठरणार असल्याचे दिसते.

नुकताच ‘क्रू’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला, ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटात तुम्हाला तीन एअर होस्टेसची कथा पाहायला मिळणार आहे, या तिघीनांही त्यांच्या आयुष्यात काहीतरी नवीन आणि वेगळं करायचं आहे पण त्या पुन्हा पुन्हा त्याच परिस्थितीत येतात जिथून ते पळत असतात.

‘क्रू’ हा एक कॉमेडी चित्रपट असेल, ज्यामध्ये करीना, तब्बू आणि क्रिती आपल्या कॉमेडीने लोकांना हसवताना दिसतील. या चित्रपटात दिलजीत दोसांझही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात तो या तीन अभिनेत्रींसोबत मस्ती करताना दिसणार आहे.

राजेश ए कृष्णन यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा चित्रपट 29 मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. अनिल कपूरची मुलगी रिया कपूर आणि एकता कपूर या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

कुणाल खेमू त्याच्या पहिल्या दिग्दर्शित चित्रपटात करणार कॅमिओ! ‘मडगाव एक्सप्रेस’चे मोठे अपडेट
…म्हणून अंकिताला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटात कास्ट करण्यासाठी रणदीप हुड्डाने दिला होता नकार

हे देखील वाचा