Monday, July 1, 2024

एअरपोर्टवर कुटूंबासह स्पॉट झाली करीना, पाहायला मिळाला चिमुकल्या तैमुर अन् जेहचा गोंडस अंदाज

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान ही सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जोरदार चर्चेत आहे. तिची प्रेग्नेंसी, तसेच तिचे पुस्तक यामुळे ती जोरदार चर्चेत होती. तसेच अनेकवेळा बाहेर स्पॉट झाली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तिचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. अशातच करीना सैफ आणि तिच्या मुलांसोबत एअरपोर्टवर स्पॉट झाली आहे. त्यांचा हा व्हिडिओ मुंबई एअरपोर्टवरील आहे. करीना मागच्या आठवड्यात सैफ अलीचा वाढदिवस असल्याने, कुटुंबासोबत मालदीवला गेली होती. सैफचा वाढदिवस १६ ऑगस्टला होता. आता ते मालदीववरुन परत आले आहेत.

व्हायरल भयानीने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये करीना, सैफ, तैमूर आणि जेह दिसत आहे. या व्हिडिओमध्ये जेह खूपच क्यूट दिसत आहे. यामध्ये त्याचा पूर्ण चेहरा देखील दिसत आहे. त्याने निळा टी-शर्ट आणि शॉर्ट्स घातलेले दिसत आहेत. तसेच त्याच्या चेहऱ्यावर गोड स्माईल दिसत आहे. तैमूर देखील मागून येताना दिसत आहे. तो पायऱ्यांवरून खाली उतरताना दिसत आहे. एक व्यक्ती त्याचा हात धरते, पण तो हात सोडून पळत गाडीकडे जातो. (kareena kapoor khan spotted on airport with family)

यावेळी तैमूरने मास्क लावलेला आहे. त्याने लाल रंगाचे शॉर्ट्स आणि हिरव्या रंगाचा टी-शर्ट घातलेला आहे. यानंतर सैफ आणि करीना बाहेर येताना दिसतात. त्या दोघांनीही चष्मा लावलेला दिसत आहे. कारमध्ये बसायच्या आधी करीना पॅपराजींना पोझ देखील देताना दिसत आहे.

करीनाने या वर्षाच्या सुरुवातीला तिच्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला आहे. तिने याआधी तिच्या मुलाचा फोटो दाखवला नव्हता. तसेच ती लगेच सोशल मीडियावर जेहचा फोटो शेअर करणार नाही असा निर्णय घेतला होता. या महिन्यात २१ तारखेला जेह ६ महिन्याचा झाला आहे. तेव्हा तिने मालदीवमधील जेहसोबतच एक फोटो शेअर केला होता. पण त्या फोटोमध्ये त्याचा चेहरा नीट दिसत नव्हता. पण आता या व्हिडिओमध्ये त्याचा स्पष्ट चेहरा दिसत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘ब्यूटी क्वीन’ डिंपल हयातीला रवी तेजाने दिले वाढदिवसाचे खास गिफ्ट; शेअर केला आगामी ‘खिलाडी’चा रोमॅंटिक पोस्टर

-खण स्कर्ट घालून रुपाली भोसलेने शेअर केले ‘हटके’ फोटोशूट, मात्र सर्वत्र रंगलीय ड्रेसची चर्चा

-‘ही’ व्यक्ती आहे अंकिता लोखंडेसाठी खूप खास; फोटो शेअर करत म्हणाली, ‘तू माझ्यासाठी…’

हे देखील वाचा