बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) नुकतीच मुंबईत पती सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि मोठा मुलगा तैमूर अली खानसोबत स्पॉट झाली. यादरम्यान सैफ आणि करीना त्यांच्या मुलासोबत लंच डेटसाठी फूड हॉलमध्ये पोहोचले होते, जिथे पॅपाराजींनी या जोडप्याला स्पॉट केले. यादरम्यान या स्टार कपलचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले आहेत, जे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
सैफ- करीनाचा व्हिडिओ व्हायरल
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरी सैफ आणि करीनाच्या लुकचे कौतुक करत आहेत. यादरम्यान, यावेळी सैफ अली खान कुर्ता पायजमा घालून नवाबी स्टाईलमध्ये दिसला, तर सनग्लासेस त्याच्या लूकमध्ये आणखीनच भर घालत होते. करीना कपूर खानच्या लूकबद्दल सांगायचे तर, बेबो गुलाबी रंगाच्या समर लूकमध्ये अतिशय साध्या आणि स्टायलिश अवतारात दिसली. मात्र, यादरम्यान तिच्या ड्रेसचा कट तिला थोडा परेशान करताना दिसून आले. (kareena kapoor khan spotted outing with saif ali khan flaunts leg from dress cut)
बोल्ड अंदाजात फ्लॉंट केला थाय-स्लिट
यावेळी करीना कपूर गुलाबी कॉटन मॅक्सी ड्रेसमध्ये दिसली. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, करीनाच्या ड्रेसमध्ये थाई स्लिट कट होता, ज्याला अभिनेत्रीने पायऱ्या उतरताना जबरदस्त फ्लॉन्ट केले होते. यासोबतच बलून स्लीव्हज तिच्या या समर लूकला परफेक्ट टच देत होते. सोबतच बेबोने स्नीकर्स आणि सनग्लासेससह तिचा लूक पूर्ण केला.
तैमूरचा अंदाजही आला चर्चेत
या काळात तैमूरचे फोटोही चर्चेत राहिले. यावेळी तैमूर टी-शर्ट आणि शॉर्ट्ससह निऑन शूजमध्ये दिसला. या फोटोंमध्ये तैमूर खूपच मॅच्युअर दिसत असल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.
करीनाचे वर्कफ्रंट
करीनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती तिच्या आगामी ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटाबाबत बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटात ती सुपरस्टार आमिर खानसोबत मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट यावर्षी ११ ऑगस्टला थिएटरमध्ये दाखल होणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा