बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खानने या वर्षाच्या सुरुवातीला मुलगा जेह याला जन्म दिला आहे. ती सध्या तिच्या परिवारासोबत वेळ घालवत आहे. तसेच तिच्या मुलांचे पालन पोषण करण्याकडे ती जास्त लक्ष केंद्रित करत आहे. परंतु काम, कुटुंब आणि मुलं या सगळ्यात तीला तिच्या गर्ल गँगला वेळ देता येत नव्हता. या सगळ्यातून वेळ काढून नुकतेच करीनाने तिच्या गर्ल गँगसोबत पार्टी केली आहे आणि भरपूर मज्जा केली आहे. त्यांच्या या पार्टीचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहे.
करीना कपूरने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीला काही फोटो शेअर केले आहे. यातील पहिल्या फोटोमध्ये ती मैत्रिणींसोबत सोफ्यावर बसलेली दिसत आहे. दुसऱ्या फोटोमध्ये करीना तिची बेस्टफ्रेंड अमृता अरोरासोबत दिसत आहे. तसेच त्यांच्या सोबत मलायका अरोरा देखील दिसत आहे. यासोबतच करीनासोबत मल्लिका भट्ट आणि महिप कपूर देखील मस्ती करताना दिसत आहेत.
करीनाने हे फोटो शेअर करून पार्टीचे लोकेशन आणि खाण्यासाठी मलायका अरोराला श्रेय दिले आहे. तसेच फोटोंचे श्रेय महीप कपूरला दिले आहे. या सोबतच करीनाने एक बुमरिंग व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये सगळ्यांनी पोझ दिल्या आहेत. हा व्हिडिओ शेअर करून लिहिले आहे की, “या आम्ही आहोत.” त्यांच्या या पार्टीचे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.(Kareena Kapoor Khan Sunday night party, photos with girls gang viral on social media)
नुकतेच करीना कपूरचे ‘करीना कपूर खान्स प्रेग्नंसी बायबल’ हे पुस्तक प्रदर्शित झाले आहे. या पुस्तकाच्या नावामुळे ती खूप चर्चेत आली होती.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-दुःखद!! अनु मलिक यांच्या आईचे निधन; अरमान मलिकने भावुक पोस्ट शेअर करत दिली माहिती