‘मुख्यमंत्र्यांचं घराणं हे कलाकारांचं घराणं आहे…’, कलाकारांची परवड थांबवण्यासाठी लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांची मुख्यमंत्र्यांना आर्त हाक!


या कोरोना काळात आर्थिक अडचणींमुळे सर्वांनाच खूप मन:स्ताप सहन करावा लागत आहे. लॉकडाउन असल्यामुळे अनेकांचे रोजगार देखील बंद झाले आहेत. इतर क्षेत्रांप्रमाणे मनोरंजन सृष्टीवरही याचा मोठ्या प्रमाणात परिणाम झाल्याचे आपण पाहू शकतो. अशा परिस्थितीत गेल्या अनेक दिवसांत बऱ्याच कलाकारांनी सरकारकडे मदत मागितल्याचे आपण पाहिले आहे. आता लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनीही गरजुंसाठी सरकारकडे विनंती केली आहे. 

कोरोना काळात लोककलावंत, कलाकार आणि तंत्रज्ञ यांचे बरेच हाल होत आहेत. मुख्यमंत्र्यांचं घराणं हे कलाकारांचं घराणं आहे. त्यामुळे त्यांनी कलाकारांच्या भावना समजून घ्याव्यात, तसेच कलाकारांना मासिक मानधन सुरु करावे, अशी नम्र विनंती लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी मुख्यमंत्र्याना केली आहे. गरजू कुटुंबियांना अन्नधान्य व रेशन किटचे वाटप कार्यक्रमात सुरेखा पुणेकर यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या पाहायला मिळाल्या.

लावणी, सांगीतिक कार्यक्रम तसेच चित्रपट, मालिका निर्मितीमध्ये खारीचा वाटा उचलणाऱ्या अशा हजारो तंत्रज्ञ, कामगारांसारख्या पडद्यामागील कलाकारांचे जगणे लॉकडाउनने मुश्कील झाल्याचे वास्तव आहे. स्पॉटबॉय, सेटिंग बॉय, लाइटमन, ग्रीसमन, साउंड असिस्टंट, साउंड रेकॉर्डीस्ट, कॉश्‍युम असिस्टंट, आर्ट असिस्टंट, मेकअप असिस्टंट, हेअर ड्रेसर यांसारख्या हजारो कष्टकऱ्यांचे या काळात प्रचंड हाल होत आहेत. कोरोनामुळे नाट्यसृष्टीवरही अवकळा पसरली आहे. कलाकारांसोबतच नृत्यकलाकार, तंत्रज्ञ यांच्यावरही बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. त्यामुळे अनेक नृत्य कलाकार आणि तंत्रज्ञांनी अन्य मार्गाचा अवलंब करत स्वतःचा उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न केला आहे. कलाकार, नृत्य कलाकार आणि नृत्य दिग्ददर्शक आणि तंत्रज्ञांची ससेहोलपट सुरू आहे. या संकटातून मार्ग काढण्यासाठी हे सर्व कलाकार आपापल्यापरिने प्रयत्न करत आहेत. त्यातच सुरश्री प्रोडक्शनच्या माध्यमातून आम्ही २०० गरजू कुटुंबियांना अन्नधान्य व रेशन किटचे वाटप करत असल्याचे, सुरेखा पुणेकर यांनी सांगितले. (pune news lavani samrath gini surekha punekars humble request to chief minister uddhavji thackeray that video)

या कार्यक्रमावेळी त्या ठिकाणी बाळासाहेब दाभेकर, अशोक पुणेकर, शिवसंग्राम पक्षाचे नांदेड जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, मनोज पुणेकर आदि मंडळी उपस्थित होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-नात नव्याचे काम पाहून पोटात मावत नाहीये ‘बिग बीं’चा आनंद; म्हणाले, ‘मला तुझा अभिमान आहे’

-राजेश्वरी खरातच्या बोल्डनेसने पाण्यातच लावली आग; ‘स्वीम सूट’मध्ये दिसली शालू

-धोनीसोबत फुटबॉल खेळायला पोहचला रणवीर सिंग; पाहायला मिळाली त्यांच्या बॉंडिंगची झलक


Leave A Reply

Your email address will not be published.