Tuesday, April 8, 2025
Home बॉलीवूड रिया कपूनने ‘द क्रू’ चित्रपटाची केली घोषणा; करिना,तब्बू अन् क्रिती साकारणार प्रमुख भूमिका

रिया कपूनने ‘द क्रू’ चित्रपटाची केली घोषणा; करिना,तब्बू अन् क्रिती साकारणार प्रमुख भूमिका

बॉलिवूडमध्ये नेहमीच तीन स्टार्स असलेले चित्रपट खूप पसंत केले जातात. अमिताभ बच्चन, ऋषी कपूर आणि विनोद खन्ना यांचा अमर अकबर अँथनी असो किंवा आमिर खान, आर माधवन आणि शर्मन जोशी यांचा 3 इडियट्स असो… असे अनेक चित्रपट आले आहेत. त्या चित्रपटामध्ये एका नव्हा तर तीन मुख्य कलाकारांवर केंद्रित होती. पण आता काळ बदला आहे. आता अशी वेळ आली आहे जेव्हा नायिकांचं त्रिकूट पाहायला मिळते.

तब्बू, करीना कपूर खान(Kareena kapoor Khan) आणि क्रिती सेनन(Kriti Sanon) यांनी त्यांच्या अभिनयाने आणि मनोरंजक चित्रपटांनी प्रेक्षकांचे मन नेहमीच जिंकले आहे. आता पहिल्यांदाच बॉलिवूडच्या या तीन सुंदर ‘लीडिंग लेडीज’ कॉमिक कॅपर ‘द क्रू’ साठी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती ‘वीरे दी वेडिंग’च्या सुपरहिट निर्मात्या जोडी एकता आर कपूर आणि रिया कपूर यांनी केली असून, दर्शकांना ड्रामा आणि कॉमेडीचा डोस देण्यासाठी सज्ज झाले आहेत.

 

View this post on Instagram

 

 

काही काळापूर्वी फरहान अख्तरने प्रियांका चोप्रा, कतरिना कैफ आणि आलिया भट्टसोबत चित्रपट बनवणार असल्याची घोषणा केली होती. ज्यामध्ये तीन महिला मैत्रिणींचे प्रवासी आयुष्य दाखवण्यात येणार आहे. आता अशाप्रकारे आणखी एका त्रिकूट विशेष चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. होय, ये है द क्रू चित्रपट, ज्यामध्ये तब्बू, करीना कपूर खान आणि क्रिती सेनॉन सारखी तगडी स्टारकास्ट दिसणार आहे.

संघर्ष करणाऱ्या एअरलाइन उद्योगाच्या पार्श्वभूमीवर आधारित ‘ द क्रू’ एक मजेशीर कॉमेडी असेल. चित्रपटात तीन महिला स्वतःला सिद्ध करण्यासाठी सर्व काही अतूट प्रयत्न करताना पाहायला मिळतील. परंतु, त्यांच्या नशिबी अनोखी परिस्थिती निर्माण होते आणि ते खोट्याच्या जाळ्यात अडकतात. ‘द क्रू’ हा चित्रपट चुका आणि विविध घडामोडींच्या विनोदाने भरपूर आहे.

निर्माती रिया कपूर म्हणाल्या, “माझ्या पुढच्या चित्रपटासाठी या तीन सुंदर, प्रतिभावान कलाकारांना आणणे हे एक स्वप्न आहे. मी उत्साहित आणि दृढनिश्चयी आहे आणि चित्रीकरण सुरू होण्याची प्रतीक्षा करू शकत नाही. तसेच, ‘वीरे दी वेडिंग’ नंतर मी एकतासोबत दुसऱ्यांदा काम करत आहे आणि ती मला सपोर्ट करत आहे हि माझ्यासाठी खूप मोठी बाब आहे.”

यावर पुढे बोलताना तब्बू म्हणाल्या, “या चित्रपटात निर्माता आणि दिग्दर्शक राजेश कृष्णन यांच्यासोबतच करीना आणि क्रिती या दोन सुंदर आणि प्रतिभावान महिला तसेच, रिया आणि एकता या दोन महिलांसोबत काम करण्यास मी उत्सुक आहे. वेडेपणा, आनंद, पात्रांच्या चढ-उतारांसह, हि एक रोलर कोस्टर असणार आहे आणि मी त्यावर स्वार होण्याची वाट पाहत आहे. राजेश कृष्णन दिग्दर्शित आणि बालाजी मोशन पिक्चर्स लिमिटेड आणि अनिल कपूर प्रॉडक्शन द्वारे सह-निर्मित, हा चित्रपट फेब्रुवारी २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे.(kareena kapoor khan tabu kriti sanon new movie the crew announce)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
ट्रान्सजेंडरची भूमिका निभावून मिळवली ओळख, पहिल्याच भेटीतच आशुतोष राणांच्या नजरेत भरली होती रेणुका शहाणे

एलएलबीचे शिक्षण घेणाऱ्या आशुतोष राणा यांनी अभिनयात करिअर करून कमावली तब्बल ‘एवढ्या’ कोटींची संपत्ती

हे देखील वाचा