करीनाला बॉलिवूडची यमी ममी म्हणून ओळखले जाते. आता करीना लवकरच दुसऱ्यांदा आई होणार आहे. दिनांक २० डिसेंबर २०१६ रोजी करीनाने तिच्या पहिल्या बाळाला म्हणजेच तैमूरला जन्म दिला. तैमूरच्या ४ थ्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजेच रविवारी (२० डिसेंबर २०२०) करीनाने तिच्या एका पुस्तकाबद्दल घोषणा केली आहे.
करीनाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट शेयर करत तिच्या पुस्तकाबद्दल माहिती दिली आहे. हे पुस्तक २०२१ मध्ये उपलब्ध होणार आहे.
करीनाने ‘करीना कपूर खान्स प्रेग्नेंसी बायबल’ या तिच्या पुस्तकाचे कव्हर पेज शेयर करत लिहले, ” आजचा दिवस या पुस्तकाची घोषणा करण्यासाठी परफेक्ट आहे. या पुस्तकामध्ये मी माझ्या पहिल्या प्रेग्नेंसी पासून दुसऱ्या प्रेग्नेंसी पर्यंतचे सर्व अनुभव शेयर केले आहेत.

मॉर्निंग सिकनेस पासून ते डाएट, फिटनेसपर्यंत सर्व माहिती या पुस्तकात असणार आहे. ज्या स्त्रिया आई होणार आहे त्यांच्यासाठी हे पुस्तक खूप उपयुक्त ठरेल असे मला वाटते. हे पुस्तक लवकर येणायची मी वाट बघत आहे.
प्रेग्नेंसी ही अवस्था प्रत्येक स्त्री साठी अतिशय महत्वाची असते. याकाळात निरोगी, स्वस्थ, आनंदी आणि फिट राहणे खूप गरजेचे असते. या पुस्तकातून मी माझी काळजी कशी घेतली? स्वतःला कसे फिट ठेवले? प्रेग्नेंसी मध्ये देखील काम करत असतांना काय काळजी घेतली याची संपूर्ण माहिती या पुस्तकातून तुम्हाला मिळेल, असे करीनाने म्हटले आहे.
पुस्तकात करीनाने तैमूर होण्याच्या आधी ९ महिन्यांपासून ते आता दुसऱ्या प्रेग्नेंसीपर्यंत तिचे अनेक अनुभव सांगितले आहेत. करीनाच्या प्रेग्नेंसीबद्दल तिला विचारण्यात आलेल्या प्रश्नांना तिने यात उत्तरे दिली आहेत. शिवाय प्रेग्नेंसीच्या काळात स्वतःची काळजी कशी घ्यायची? प्रेग्नेंसीनंतर बाळाची काळजी कशी घ्यायची? हे देखील तिने सांगितले आहे.
करीना दुसऱ्यांदा आई होत आहे. तरी देखील ती तिचे काम उत्तम प्रकारे करत आहे. प्रेग्नेंसीतच तिने तिच्या
आगामी ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले. करीना तिच्या दोन्ही प्रेग्नेंसी दरम्यान भरपूर ऍक्टिव्ह आहे. करीनाची २०२१ मध्ये डिलिव्हरी होणार आहे.