Friday, July 25, 2025
Home बॉलीवूड विश्वासच बसणार नाही! जास्त वयात आई बनलेल्या बॉलिवूड अभिनेत्री; एकीने तर ४३ व्या वयात दिला ३ मुलांना जन्म

विश्वासच बसणार नाही! जास्त वयात आई बनलेल्या बॉलिवूड अभिनेत्री; एकीने तर ४३ व्या वयात दिला ३ मुलांना जन्म

प्रत्येक स्त्रीसाठी आई होणे ही खूप मोठी गोष्ट असते. डॉक्टर्स महिलांना नेहमी सल्ला देतात की, जास्त वयात आई बनण्याचा निर्णय चुकीचा ठरू शकतो. आई बनण्यासाठी योग्य वय हे २५ ते ३० सांगितले जाते. परंतु सध्याच्या काळात मुली आपल्या करिअरबाबत खूप सजग होत आहेत. त्यामुळे लग्नानंतर कुटुंब वाढवण्याचा विचार महिलांना लवकर येत नाही. अशाच प्रकारे बॉलिवूडमध्येही काही अभिनेत्री आहेत, ज्यांना जास्त वय होऊनही आई होण्यास कसलाही संकोच करत नाहीत.

करीना कपूर खान
या यादीत सर्वात पहिले नाव बॉलिवूडची अभिनेत्री करीना कपूर खानचे येते. करीना कपूर सध्या आपली गर्भधारणेचा आनंद लूटत आहे. करीनाने मागील वर्षी आपला ४० वा वाढदिवस साजरा केला. आता ती लवकरच दुसऱ्या अपत्याला जन्म देणार आहे. यापूर्वी तिने ३६ व्या वर्षी तैमूरला जन्म दिला होता.

फराह खान
कोरिओग्राफर आणि चित्रपट निर्माता फराह खानबाबत बोलायचं झालं, तर तिने ४३ वर्षांच्या वयात एकसोबत तीन मुलांना जन्म दिला होता. तरीही, फराह नैसर्गिकरीत्या आई बनू शकली नव्हती. त्यामुळे तिने IVF पद्धतीचा आधार घेतला होता. त्यामार्फत ती ३ अपत्यांची आई बनली आहे.

ऐश्वर्या राय बच्चन
बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक आणि मिस वर्ल्ड राहिलेली अभिनेत्री ऐश्वर्या रायने ३३ व्या वर्षी अभिषेक बच्चनसोबत लग्न केले होते. लग्नानंतर ऐश्वरायने ३७ व्या वर्षी मुलगी आराध्याला जन्म दिला होता.

काजोल
बॉलिवूड अभिनेत्री काजोलने अजय देवगणसोबत सन १९९९ मध्ये लग्न केले होते. लग्नानंतर जवळपास ४ वर्षांनंतर काजोलला पहिली मुलगी ‘नीसा’ देवगणचा जन्म झाला होता. यानंतर जवळपास ६ वर्षांनंतर काजोलने मुलगा ‘युग’ला जन्म दिला होता. युगच्या जन्मावेळी काजोलचे वय ३६ वर्षे होते.

शिल्पा शेट्टी
बॉलिवूडमध्ये सर्वात फीट अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी शिल्पा शेट्टीचाही या यादीत समावेश आहे. शिल्पाने ३४ व्या वर्षी राज कुंद्रासोबत लग्न केले होते. लग्नाच्या जवळपास ४ वर्षांनंतर शिल्पाने आई होण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर तिने २०१२ मध्ये ३७ व्या वर्षी मुलगा ‘वियान’ला जन्म दिला. शिल्पा आणि राज यांना एक मुलगीही आहे. तिचे नाव ‘शमिशा’ आहे. शमिशाचा जन्म हा सरोगसीमार्फत झाला आहे.

राणी मुखर्जी
राणी मुखर्जीने चित्रपट निर्माता आदित्य चोप्रासोबत सन २०१४ मध्ये झाले होते. लग्नानंतर राणीने ३७ व्या वर्षी मुलगी ‘आदिरा’ला जन्म दिला होता.

माधुरी दीक्षित
बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री माधुरी दीक्षितचे नावही या यादीत सामील आहे. माधुरीने सन १९९९ मध्ये डॉक्टर श्रीराम नेनेसोबत लग्न केले होते.

लग्नानंतर ३७ व्या वर्षी माधुरी पहिल्यांदा आई बनली होती. त्यानंतर ती पुन्हा ३९ व्या वयात दुसऱ्यांदा आई झाली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

किंग खानपासून ते फिट अभिनेत्री शिल्पा शेट्टीपर्यंत ‘या’ दिग्गज कलाकारांनी केला अपत्यप्राप्तीसाठी सरोगसीचा वापर

यालाच म्हणतात ‘आंखो का धोका’, शिल्पा शेट्टीचा नवीन व्हिडिओ पाहून तुम्हीही असेच म्हणाल

शिल्पा शेट्टीला शुभेच्छा देणं पडलं भलतंच महागात, चाहत्यांनी चांगलेच घेतले फैलावर

हे देखील वाचा