शिल्पा शेट्टीला शुभेच्छा देणं पडलं भलतंच महागात, चाहत्यांनी चांगलेच घेतले फैलावर

प्रजासत्ताक दिनी शिल्पा शेट्टीने दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा, वापरकर्त्यांनी केले जबरदस्त ट्रोल, दुरूस्ती करून पुन्हा केले ट्वीट


काल 72वा प्रजासत्ताक देशभरात अगदी देशभक्तीने साजरा केला गेला. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे बरेचसे कार्यक्रम पुढे ढकलले गेलेे, पण सर्वांमध्ये बराच उत्साह प्रजासत्ताक दिनी दिसला. सर्वसामान्यांप्रमाणे बॉलिवूड सेलेब्सही हा दिवस आनंदाने साजरा करताना आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांना शुभेच्छा देताना दिसले. असे असले तरीही शिल्पा शेट्टीने काल सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रजासत्ताक दिनाच्या तसेच स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या, मात्र तिला खुप ट्रोलिंगचा सामना करावा लागला.

शिल्पा शेट्टीने काल तिच्या ट्विटर हँडलवरून एक ट्विट केले होते ज्यात ती प्रजासत्ताक दिन तसेच स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देताना दिसली होती. मात्र, आपली चूक लक्षात येताच शिल्पाने लगेचच तीचे ट्विट डिलीट करत नव्याने ट्विट केले.

शिल्पाने काही काळानंतर आपले ट्विट दुरुस्त केले होते, परंतु तोपर्यंत ट्विटरवर तिला वाईट रीतीने ट्रोल केले गेले. एका वापरकर्त्याने लिहिले की, ‘पुढच्या 26 जानेवारीला आपण हे लक्षात ठेवूया’. त्याचवेळी दुसर्‍या वापरकर्त्याने लिहिले – ‘ असे कसे चालेल दिदी?’ एवढेच नव्हे तर एका वापरकर्त्याने लिहिले की, ‘आम्ही यांची नशा बघायला आलो होतो, पण लोकांनी यांचीच नशा उतरवली. अरे बॉलिवूडवाल्यांना कोणीतरी हे समजवा की स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन वेगवेगळा असतो.’

शिल्पा शेट्टी ही बॉलिवूडमधील एक सुंदर आणि प्रतिभावान अभिनेत्री आहे. आजकाल शिल्पा चित्रपटांपासून दूर आहे, पण ती सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह राहते. तिचे मजेदार व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडतात. चाहते शिल्पाच्या पोस्टला भरभरून प्रेम देतात, पण यावेळी चाहत्यांनी तिला ट्रोल केले.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचं म्हटलं तर शिल्पा लवकरच ‘हंगामा 2’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाच्या सेटमधून तिने स्वत: चा एक व्हिडिओही शेअर केला होता, जो चाहत्यांना खूप आवडला. याशिवाय तिचा ‘निक्कम्मा’ हा चित्रपटही पाहायला मिळणार आहे. ‘निकम्मा’ मध्ये शिल्पा शेट्टीसोबत भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यू दासानी आणि गायिका शर्ली सेटिया मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.


Leave A Reply

Your email address will not be published.