Thursday, June 26, 2025
Home बॉलीवूड जेव्हा दोन मैत्रिणी अनेक वर्षांनी एकमेकांना भेटतात, करीना आणि काजोलचा व्हिडिओ झाला व्हायरल

जेव्हा दोन मैत्रिणी अनेक वर्षांनी एकमेकांना भेटतात, करीना आणि काजोलचा व्हिडिओ झाला व्हायरल

बॉलिवूडमधील दोन प्रसिद्ध अभिनेत्री आणि मैत्रीनी करीना कपूर आणि काजोल यांचा एक व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, करीना आणि काजोल मुंबईतील मेहबूब स्टुडिओ बाहेर गप्पा मारताना दिसत आहे. दोघी जणी खूप वर्षांनंतर एकमेकांना भेटलेल्या मैत्रिणी प्रमाणे गप्पा मारता ना दिसत आहेत. त्यांच्या या व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. काही लोकांना त्यांना बघून ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटाची आठवण आली आहे. काजोल करीनाला जेहबाबत विचारत आहे. जाताना दोघी एकमेकींना मिठी मारताना दिसत आहे.

त्या दोघींना स्टुडिओबाहेर पाहून पॅपराजींनी त्यांना कॅमेरात कैद केले. त्या दोघी ही ब्लॅक अँड व्हाईट मॅचींग ड्रेसमध्ये दिसत आहे. त्या दोघी एकमेकांना पाहून खूप खुश झाल्या. एकमेकींशी जोरदार गप्पा मारताना दिसत आहेत. यात काजोल करीनाला विचारते “तुझा नवीन मुलगा कसा आहे.” यावर करीना हसून म्हणते की, “ओह गॉड आता एक वर्ष झाले. आम्हाला सगळ्यांना कोर ना झाला होता.” यावर काजोल देखील सांगते की, “तिला कोरोना झाला होता.” (Kareena Kapoor meet Kajol, video viral on social media)

करीना आणि काजोलच्या या व्हिडिओवर सोशल मीडियावर युजरने लिहिले आहे की, “बहिनींनो चुगली करा.” असं वाटतं आहे की, “आंटी गॉसिप करत आहेत.” आणखी एकाने लिहिले आहे की, “गॉसिप्स क्वीन,” अशाप्रकारे अनेकजण त्यांच्या या व्हिडिओवर कमेंट करत आहेत. त्या दोघींना अनेक दिवसांनी एकत्र पाहून चाहत्यांना देखील आनंद झाला आहे. काजोल आणि करीना दोघीही लोकप्रिय अभिनेत्री आहेत.

‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटात करीनाने काजोलच्या छोट्या बहिणीचे पात्र निभावले होते. त्यांचा हा चित्रपट खूप गाजला होता. चित्रपटात शाहरुख खान, ऋतिक रोशन, अमिताभ बच्चन आणि जया बच्चन हे कलाकार देखील होते.

हेही वाचा :

हे देखील वाचा