Friday, July 5, 2024

तैमूरने पहिल्यांदा पाहिला बॉलिवूड सिनेमा, वडिलांचा नाही तर ‘या’ अभिनेत्याचा झालाय जबरा फॅन

कार्तिक आर्यन (Kiara Advani) आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) यांच्या ‘भूल भुलैया २’ या चित्रपटाची जादू सर्वांवर पडली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आणि २०० कोटींहून अधिक कमाई केली. हा चित्रपट लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनी पाहिला आणि त्यांना आवडला. सामान्य जनताच नाही तर पतौडी घराण्याचा धाकटा नवाब तैमूर अली खानही या चित्रपटाचा मोठा चाहता झाला आहे.

अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान करीना कपूर तिचा मुलगा तैमूर अली खानबद्दल अनेक चर्चा करताना दिसली. सध्या करीना कपूर तिच्या लाल सिंग चड्ढा या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट त्याच दिवशी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान, ती तिच्या कुटुंबाबद्दल आणि दोन्ही मुलांबद्दल तैमूर आणि जे अली खानबद्दल खूप बोलली. करीनाने अलीकडेच तिच्या एका मुलाखतीत सांगितले की, पाच वर्षांच्या तैमूरने पहिल्यांदाच बॉलिवूडमधील चित्रपट पाहिला आहे. तेही करीना कपूर आणि सैफ अली खानचे नाही, तर कार्तिक आर्यनचे.

करीना कपूरने मुलाखतीदरम्यान सांगितले की, “अलीकडेच तैमूर वडील सैफ अली खानसोबत पहिला हिंदी चित्रपट पाहण्यासाठी सिनेमात गेला होता आणि त्याने पाहिलेला चित्रपट म्हणजे कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी स्टारर चित्रपट ‘भूल भुलैया 2’. करीनाने पुढे सांगितले की, तैमूर अली खानला तो चित्रपट खूप आवडला. करिनाच्या मते, तैमूरला हॉरर चित्रपट आवडतात.” आता तो वारंवार करीनाला चित्रपटाची कथा सांगण्यास सांगतो.

भूल भुलैया 2′ या चित्रपटात कार्तिक आणि कियाराशिवाय तब्बू, राजपाल यादव, संजय मिश्रा हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसले होते. या चित्रपटाने अशा प्रकारे यशाचा झेंडा रोवला आहे की आता प्रेक्षक त्याच्या तिसऱ्या भागाचीही वाट पाहत आहेत.

हेही वाचा –जेठालालला मिळाली नवीन दया, ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मध्ये ‘ही’ अभिनेत्री घेणार दिशा वकानीची जागा
आहा कडकच ना! मौनीच्या नव्या फोटोंनी वाढवले सोशल मीडियाचे तापमान
‘डार्लिंग्स’ चित्रपटातील ‘तो’ सिन व्हायरल, शेफाली शाहच्या भूमिकेने प्रेक्षकांना केले चकित

हे देखील वाचा