Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

लग्न होतं रणबीर-आलियाचं पण भाव खाऊन गेले दोन पोरांचे आईबाप असलेले सैफ-करिना

बॉलिवूडमध्ये सध्या आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) लग्नाचा बार उडला आहे. चित्रपट जगतातील या आवडत्या जोडीच्या लग्नाची अनेकांना उत्सुकता लागली होती. अनेक महिने त्यांच्या प्रेमप्रकरणाची चर्चा रंगली होती. आता अखेर ही लव्हस्टोरी लग्नापर्यंत पोहचली आहे. सध्या संपूर्ण सोशल मीडियावर त्यांच्या या लग्नाचे फोटो व्हायरल होत आहेत, चित्रपट जगतातील अनेक दिग्गजांनी या सोहळ्याला हजेरी लावली होती. मात्र या नववधू आणि वरापेक्षा सर्वात जास्त चर्चा होतेय ती सैफ अली खान (Saif ali Khan) आणि करीना कपूरच्या (Kareena Kapoor) जबरदस्त लूकची. या जोडीने केलेला जबरदस्त गेटअपने सर्वांच्याच नजरा त्यांच्यावर खिळलेल्या दिसत आहेत. 

याबाबत संपुर्ण माहिती अशी की,  बॉलिवूड जगतात आलिया आणि रणबीरच्या लग्नाच्या बातम्यांनी सध्या सोशल मीडियावर महापूर आल्याचे पहायला मिळत आहे. चित्रपट जगतातील अनेक तारका या लग्नाला उपस्थित होत्या. लग्नातील खास जेवणापासून ते वधू वराच्या लूकपर्यंत प्रत्येक गोष्टीची सध्या माहिती समोर येत आहे. मुंबईच्या आर.के स्टुडिओमध्ये या शाही विवाह सोहळा पार पडला. लग्नाला उपस्थित असलेल्या अनेक अभिनेत्री आणि अभिनेत्यांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र सगळ्यात जास्त लक्ष वेधले ते करीना आणि सैफ अली खानच्या जोडीने. महागडी साडी, भारदस्त दागिने आणि केसात लावलेली बिंदी यामुळे करीना अगदी नववधूसारखी दिसत आहे तर सैफअली खानही सूट आणि कोट घालून अगदी रुबाबदार दिसत आहे. त्यामुळे या लग्नात नववधूपेक्षा या जोडीनेच सर्वांचे लक्ष वेधले आहे.

दरम्यान, आलिया आणि रणबीरच्या लग्नाची अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. शेवटी हा शाही सोहळा पार पडल्याने त्यांच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. सैफ अली खान आणि करीना नेहमीच विविध कारणांनी सोशल मीडियावर चर्चेत असतात. त्यांच्या व्हायरल फोटोंची आणि व्हिडिओची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा रंगलेली असते. अनेकदा करीना तिच्या व्हायरल फोटोंमुळे नेटकऱ्यांच्या निशाण्यावरही येते. मात्र आलियाच्या लग्नातील तिच्या लूकने करीना चांगलीच भाव खाऊन गेली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा