Wednesday, July 3, 2024

ट्रोलिंगकडे साफ दुर्लक्ष करत करीना कपूर खानने पोस्ट केला दुसरा मुलगा ‘जहांगीर’चा फोटो

जेव्हापासून करीना कपूरने तिच्या दुसऱ्या मुलाचे नाव जाहीर केल्यानंतर सोशल मीडियावर करीनाला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागत आहे. सोशल मीडियावर सैफ आणि करीना सध्या नेटकऱ्यांच्या निशाण्यावर असून, मुलाच्या ‘जहांगीर’ नावावरून त्यांना ट्रोल केले जात आहे. करीनाच्या ‘प्रेग्नन्सी बायबल’ पुस्तकातून करिनाने तिच्या मुलाचे खरे नाव जाहीर केले. इतके दिवस सर्वांनाच त्याचे नाव ‘जेह’ वाटत होते, मात्र पुस्तकातून त्याचे नाव ‘जहांगीर’ असल्याचे समजल्यावर आता ते ट्रोल होत आहे.

या सर्व ट्रोलिंगच्या वातावरणात करिनाने तिच्या दुसऱ्या मुलाचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये जहांगीरचा चेहरा मात्र दिसत नाहीये. पण या फोटोमध्ये त्याची ऍक्टिव्हिटी आपण नक्कीच पाहू शकतो. जहांगीर त्याचे पाय हलवत हातात जिराफ घेऊन खेळताना दिसत आहे. जहांगीरच्या या फोटोमध्ये करिना कपूरचा नाश्ता देखील दिसत आहे. (kareena kapoor shares new picture of jahangir)

करीना तिच्या नाश्त्यामध्ये एवोकॅडो आणि चेरी टोमॅटो खात आहे. हा फोटो पोस्ट करताना करिनाने लिहिले, ‘सोफी जिराफसह नाश्ता.’ करिनाने याचवर्षी फेब्रुवारीमध्ये दुसऱ्यांदा आई झाली. तिने एका मुलाला जन्म दिला. मात्र अद्यापही तिने तिच्या मुलाचा फोटो जगासमोर आणला नाहीये. ती आणि तिचे संपूर्ण कुटुंब त्यांचे खासगी आयुष्य एन्जॉय करत आहे.

Photo Courtesy: Instagram/kareenakapoorkhan

 

सध्या करीनाच्या दुसऱ्या मुलाच्या नावावरून मोठा वादंग उठला आहे. वेगवेगळ्या कमेंट्स, मिम्स, ट्रोलिंग यासर्व गोष्टींवर करीना किंवा सैफकडून काहीच उत्तर आले नव्हते. मात्र नुकतेच करिनाने यावर तिचे मत व्यक्त केले आहे. एका मुलाखतीमध्ये करिनाने यासर्व गोष्टींवर मनमोकळी उत्तरे दिली.

यावेळी करीना म्हणाली, ” मी एक सकारत्मक व्यक्ती असून, मी नेहमीच सकारात्मकता आणि आनंदच पसरवू इच्छित असते. नकारात्मकतेची माझ्याजवळ अजिबात जागा नाहीये. आता जगात असलेल्या कोरोनाचेच बघा, हा आजार सर्व जगाला जवळ घेऊन आला आहे. आपल्याला अशा सर्व गोष्टींवर विचार करायला पाहिजे. आता राहिला प्रश्न ट्रोलिंगचा तर यासर्व गोष्टींशी डील करण्यासाठी मला मेडिटेशन चालू करावे लागेल. मी आता दोन निरागस लहान मुलांबद्दल बोलत आहे.”

 

मुख्य म्हणजे आता जसे करीना सैफला त्यांच्या दुसऱ्या मुलाच्या नावावरून ट्रोल केले जात आहे, असेच ट्रोल त्यांना पहिल्या मुलाच्या ‘तैमूर’ नावावरून देखील केले गेले होते.

 

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-या वीकेंडलाही ‘सुपर डान्सर’मध्ये शिल्पा शेट्टी गैरहजर; पण जॅकी अन् संगीताची जोडी लावणार ‘चार चाँद’

-आर माधवनसोबत विमानात पहिल्यांदाच घडले ‘असे’ काही; अभिनेत्याचा व्हिडिओ पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

-युरोप फिरून ५ महिन्यानंतर मायदेशी परतली परिणीती चोप्रा; म्हणाली, ‘आपल्या घरासारखे…’

हे देखील वाचा