बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खानने एक आठवड्यापूर्वी तिचे ‘करीना कपूर खान्स प्रेग्नंसी बायबल’ हे पहिले पुस्तक लॉन्च केले आहे. या पुस्तकाच्या नावामुळे ती वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. या पुस्तकात तिचा छोटा मुलगा जेह याचे काही फोटो समोर आले आहेत. करीना कपूरच्या एका फॅन पेजवरून जेहचे हे फोटो समोर आले आहेत. जे सध्या जोरदार व्हायरल होत आहेत. मागील अनेक दिवसांपासून सैफ अली खान आणि करीना कपूर खानचे अनेक चाहते त्यांच्या छोट्या मुलाचे फोटो बघण्यास उत्सुक होते. अनेक दिवसांपासून त्यांच्या छोट्या मुलाचे नाव आणि त्याचे फोटो यावरुन चर्चा चालू होती. अखेर जेहचा चेहरा सर्वांना दिसला आहे.
करीना कपूरच्या एका फॅन पेजवरून शेअर केलेल्या या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, करीना कपूर आणि तिचा छोटा मुलगा दिसत आहे. हे फोटो शेअर करून असे कॅप्शन दिले आहे की, “तिच्या पुस्तकातील काही अनसीन फोटो पाहून आम्ही खूप उत्साहित झालो आहोत.” यातील पहिला फोटो तैमूरचा आहे, तर दुसरा फोटो जेहचा आहे. (Kareena Kapoor son jeh’s unseen photo viral from fan page from her pregnancy Bible book)
हा फोटो पाहून तिचे चाहते खूप प्रतिक्रिया देत आहेत. नेटकरी असे म्हणत आहेत की, जेह देखील तैमूरप्रमाणे क्यूट आहे. नुकतेच करीना आणि सैफने त्यांच्या दुसऱ्या मुलाच्या नावाचा खुलासा केला आहे. या वर्षी फेब्रुवारी महिन्यात जेहचा जन्म झाला आहे. करीनाने अजूनही सोशल मीडियावर त्याचा फोटो शेअर केला नाही, कारण तैमूरप्रमाणे तो देखील चर्चेत यावा, असे तिला वाटत नव्हते.
करीना कपूर खान आणि तिची सहलेखिका आदिती शाह यांनी करीनाच्या प्रेग्नंसीवर एक पुस्तक लिहिले आहे. ‘करीना कपूर खान्स प्रेग्नंसी बायबल’ या नावाचे पुस्तक त्यांनी प्रदर्शित केले आहे. परंतु या पुस्तकामुळे आता चांगलाच वाद उभा राहिला आहे. कारण या पुस्तकातील ‘बायबल’ या शब्दावर आक्षेप व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे ख्रिश्चन धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. ही तक्रार अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाने दाखल केली आहे. त्यांनी बिड येथील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये ही तक्रार दाखल केली आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…