Tuesday, June 24, 2025
Home बॉलीवूड ‘लाल सिंह चड्ढा’च्या बहिष्कारावर करीना कपूरची प्रतिक्रिया; म्हणाली, ‘आमचा चित्रपट…’

‘लाल सिंह चड्ढा’च्या बहिष्कारावर करीना कपूरची प्रतिक्रिया; म्हणाली, ‘आमचा चित्रपट…’

बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खानच्या (Aamir Khan) आगामी चित्रपट ‘लाल सिंग चड्ढा’वर सोशल मीडियावरील बहिष्कार थांबण्याचे नाव घेत नाहीये. ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाला अवघे १० दिवस उरले असताना, चित्रपटावर बहिष्कार मोहिमेबाबत गदारोळ सुरुच आहे. दरम्यान, ‘लाल सिंग चड्ढा’ची मुख्य अभिनेत्री करीना कपूरनेही (Kareena Kapoor) आपले मौन तोडले, असून चित्रपटाच्या निषेधाबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

काय म्हणाली करीना कपूर?
महत्त्वाचं म्हणजे, रिपोर्टनुसार, करीना कपूरने ‘लाल सिंग चड्ढा’च्या बहिष्काराबद्दल तिचं मत मांडलं आहे. करीना म्हणते की, “मी पाहिलं आहे की, काही जण आमच्या चित्रपटावर बहिष्कार घालण्याची मोहीम राबवत आहेत. यात काही नुकसान नाही. लोकांना काही गोष्टी आवडतात आणि काही आवडत नाहीत, हा त्यांच्या स्वत:च्या आवडीचा विषय आहे.” (kareena kapoor spoke about on laal singh chaddha boycott)

पुढे अभिनेत्री म्हणाली, “मी देखील माझ्या आवडी-निवडीनुसार सोशल मीडियावर गोष्टी शेअर करते. पण आमचा चित्रपट चांगला निघाला, तर हे लोक काय करतील? माझा विश्वास आहे की, एखादा चित्रपट चांगला असेल, तर तो प्रत्येक कठीण टप्पा पार करेल आणि यशाच्या शिखरांना स्पर्श करेल. अशा परिस्थितीत, आपण निषेधाच्या या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून पुढे जायला शिकले पाहिजे.” (मात्र, आम्ही करीनाच्या या विधानाला अधिकृत दुजोरा देऊ शकत नाही.)

बहिष्कारामुळे अडचणीत आला ‘लाल सिंग चड्ढा’
गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर ‘लाल सिंग चड्ढा’ बॉयकॉट ट्रेंड करत असल्याची माहिती आहे. याचे कारण असे सांगितले जात आहे की, हा चित्रपट हॉलिवूड चित्रपट ‘फॉरेस्ट गंप’ची कॉपी आहे. यासोबतच ‘लाल सिंग चड्ढा’ला चित्रपटाचा अभिनेता आमिर खानने यापूर्वी केलेल्या काही वादग्रस्त विधानांचा फटकाही सहन करावा लागला आहे. अशा परिस्थितीत, ११ ऑगस्टला ‘लाल सिंग चड्डा’ काय कमाल दाखवतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा