बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. त्यामुळे करीना तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे सतत चर्चेत असते. करीना ही तिच्या अभिनयाबरोबरच उत्कृष्ट स्टाईल सेन्ससाठीही ओळखली जाते. करीना सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक पोस्ट शेअर करत असते. करीना किंबहुना तिची संपूर्ण फॅमिलीवर कायम मीडियावाल्यांची नजर असते. सध्या करीना कपूर करीनाने परिधान केलेल्या आऊटफिटमुळे पुन्हा ती चर्चेत आली आहे.
अलीकडेच करीना कपूर तिच्या एका आउटफिटमुळे चर्चेचा विषय बनत आहे. करीनाने पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट घातला आहे. या टी-शर्टची किंमत जाणून सर्वच आश्चर्यचकित झाले आहेत. करीनाने परिधान केलेल्या या टी-शर्टची किंमत लाखांमध्ये असल्याचे सांगितले जात आहे. सध्या तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अनेकांनी करिनाने परिधान केलेला हा टी-शर्ट २०० ते ५०० रुपयांना मिळेल असे सांगितले आहे. करीनाने या पांढऱ्या टी-शर्टसोबत काळी जीन्स आणि बूट घातलेले असून, सोबत काळ्या रंगाचे सनग्लासेस घातले आहे.
करीनाच्या या फोटोला सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून भरपूर प्रतिक्रिया मिळत आहेत. अनेकजण करीनाच्या या नवीन लूकला पसंती दर्शवित आहे. मात्र, याचबरोबर अनेकांनी करीनाला ट्रोल देखील केले आहे. हा टी-शर्ट पाहून अनेकांनी तर हा टी-शर्ट २०० ते ५०० रुपयांना बाजारात मिळेल असेही म्हटले आहे.
मागील काही दिवसांपासून करीना आणि सैफ सतत ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे. करीना आणि सैफच्या दुसऱ्या मुलाच्या नावावरून या दोघांना मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले जात आहे. करिनाने फेब्रुवारी २०२१ मध्ये दुसऱ्या मुलाला जन्म दिला. त्यानंतर काही महिन्यांनी त्याचे नाव जहांगीर उर्फ जेद असल्याचे जाहीर केले. करिनाने तिच्या प्रेग्नन्सीमधल्या अनुभवांवर एक पुस्तक देखील लिहिले आहे. काही आठवड्यांपूर्वीच या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले होते.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
–सलमान खानच्या कुटुंबीयांनी वाजत गाजत दिला दिड दिवसाच्या बाप्पाला निरोप
–‘त्याच्याबरोबर’ प्रिया बापटने शेअर केला उमेश कामतसोबतच गोड फोटो, चाहत्यांच्या खिळल्या नजरा
–‘क्या खूब लगती हो!’ सिंपल आणि स्वीट लूकमधील तेजस्विनी पंडितचे आकर्षक फोटो