Thursday, November 30, 2023

HBD I ‘क्या खूब लगती हो!’ सिंपल आणि स्वीट लूकमधील तेजस्विनी पंडितचे आकर्षक फोटो

तेजस्विनी पंडित मराठी सिनेसृष्टीतील एक अतिशय नामांकित आणि प्रसिद्ध अभिनेत्री आहे. मनोरंजन क्षेत्रातील एक मोठे नाव असण्याबरोबरच, ही अभिनेत्री सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. बर्‍याचदा तिचे फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत असतात. ही मराठमोळी अभिनेत्री तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे बऱ्याचदा चर्चेत येत असते. तिच्या चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी ती सतत फोटो आणि व्हिडिओ शेअर करत राहते. तिच्या या पोस्ट्सला चाहत्यांकडूनही खूप प्रेम मिळते. त्यामुळे तिचे फोटो बरेच व्हायरल होत असतात. अशातच तिचे आणखी काही मनमोहक फोटो समोर आले आहेत.

तेजस्विनीने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे काही साडीमधील फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तेजस्विनी खूपच गोड दिसत आहे. तिने हिरव्या रंगाची एक साधी साडी नेसली असून, त्यावर केसांची वेणी घातली आहे. कानात झुमके, हातात लाल रंगाच्या बांगड्या आणि कपाळावर लाल रंगाची टिकली लावली आहे. या फोटोमध्ये ती खूपच आकर्षक दिसत आहे. (Marathi actress tejaswini pandit’s new saree look photos viral on social media)

तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत. अनेकांना तिचे हे फोटो आवडले आहेत. तिचे चाहते या फोटोवर सातत्याने कमेंट करून तिचे कौतुक करत आहेत. तसेच अभिनेत्री खुशबू तावडे हिने हार्ट ईमोजी पोस्ट केली आहे.

तेजस्विनीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने ‘अगं बाई अरेच्चा’ या चित्रपटात खलनायिकाची भूमिका निभावली होती. त्यानंतर तिने ‘रखेली’ या नाटकात काम केले. तिला ‘मी सिंधुताई सपकाळ’ या चित्रपटातून खूप ओळख आणि लोकप्रियता मिळाली. तसेच तिने ‘तू ही रे’ या चित्रपटात काम करून सगळीकडे आपली ओळख निर्माण केली. या चित्रपटात तिच्यासोबत सई ताम्हणकर आणि स्वप्निल जोशी हे होते.

अधिक वाचा

‘रामायण’मधील ‘सीता’ दीपिका चिखलियाला मॉर्डन अवतारात पाहून भडकले नेटकरी म्हणाले, ‘हातात काय आहे’

अभिनेता करण मेहराने केला पत्नी निशा रावलवर फसवणुकीचा आरोप म्हणाला, ‘ती परपुरुषासोबत राहते’

एकेकाळी ‘देसी गर्ल’च्या प्रेमात होता शाहरुख खान, मग पत्नीला समजताच झाले असे काही

हे देखील वाचा