Friday, September 20, 2024
Home बॉलीवूड हॅपी बर्थडे आणि भोपळ्याची भाजी पाठवते आहे! करीनाच्या साराला मजेदार शुभेच्छा…

हॅपी बर्थडे आणि भोपळ्याची भाजी पाठवते आहे! करीनाच्या साराला मजेदार शुभेच्छा…

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आज तिचा २९ वा वाढदिवस साजरा करत आहे. बॉलिवूडमधील अनेक स्टार्सनी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सावत्र आई असलेल्या करीना कपूर खाननेही साराला तिच्या बर्थडे वर वेगळ्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. करिनाने सारा आणि तिचे वडील सैफ अली खान यांचा एक जुना फोटो शेअर केला आहे.

या फोटोमध्ये सारा आणि सैफ ब्लॅक आउटफिटमध्ये एकत्र दिसत आहेत. या फोटोसोबत करीनाने लिहिले, ‘हॅपी बर्थडे डार्लिंग सारा. खूप प्रेम आणि भोपळ्याची भाजी  पाठवत आहे.’ 

अभिनेत्री अनन्या पांडेनेही सारा अली खानला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तीने इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली, ज्यामध्ये ती आणि सारा एकत्र केक खाताना दिसत आहेत. स्टोरी शेअर करताना अनन्याने लिहिले, ‘तुझा वाढदिवस आहे, आनंदी राहा आणि केक खा, खूप प्रेम.’

सारा अली खानच्या आगामी कामांबद्दल बोलायचे झाल्यास, ती पहिल्यांदाच आयुष्मान खुरानासोबत ॲक्शन-कॉमेडी चित्रपटात स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. या चित्रपटाची निर्मिती करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन आणि गुनीत मोंगाच्या सिख्या एंटरटेनमेंटने केली आहे. मात्र, या चित्रपटाचे नाव अद्याप समोर आलेले नाही. याशिवाय सारा ‘मेट्रो इन दिनो’ मध्ये आदित्य रॉय कपूरसोबत दिसणार आहे. या चित्रपटात अली फजल, फातिमा सना शेख, अनुपम खेर, नीना गुप्ता, पंकज त्रिपाठी आणि कोंकणा सेन शर्मा यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

सारा अली खान यापूर्वी ‘मर्डर मुबारक’ या मिस्ट्री थ्रिलर चित्रपटात आणि ‘ए वतन मेरे वतन’ या देशभक्तीपर थ्रिलर चित्रपटात दिसली होती. 

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा –

ऑलिम्पिक मध्ये ॲक्शन अवतारात अवतरला टॉम क्रुझ ! सर्वांना बसला आश्चर्याचा धक्का …

 

 

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा