Sunday, August 10, 2025
Home बॉलीवूड पूर्व पती संजय कपूरच्या अंत्यसंस्कारात करिश्मा झाली भावुक, करीना आणि सैफने दिला आधार

पूर्व पती संजय कपूरच्या अंत्यसंस्कारात करिश्मा झाली भावुक, करीना आणि सैफने दिला आधार

अभिनेत्री करिश्मा कपूर (karishma Kapoor) तिचा माजी पती संजय कपूरच्या अंत्यसंस्कारासाठी दिल्लीत पोहोचली. यादरम्यान तिची दोन्ही मुले समायरा आणि कियान देखील तिच्यासोबत दिसली. तसेच, बहीण करीना कपूर देखील पती सैफ अली खानसोबत अंत्यसंस्काराला पोहोचली. आता काही फोटो समोर आले आहेत, ज्यामध्ये करिश्मा तिच्या मुलांना आणि बहीण करिनासोबत सांत्वन देताना दिसत आहे.

अंत्यसंस्कारादरम्यान करिश्मा कपूर खूपच भावनिक दिसत होती. काही फोटोमध्ये ती तिच्या मुलांसोबत उभी राहून त्यांना मिठी मारून सांत्वन देत आहे. तर एका फोटोत करीना करिश्माचे सांत्वन करत आहे. यादरम्यान, सैफ अली खान देखील त्यांच्यासोबत उभा असल्याचे दिसून आले. यादरम्यान करिश्मा कुटुंबातील इतर अनेक सदस्यांना भेटतानाही दिसली.

संजय कपूर यांचे अंत्यसंस्कार नवी दिल्लीतील लोधी रोड स्मशानभूमीत करण्यात आले. सोशल मीडियावर फिरणाऱ्या एका नोटनुसार, २२ जून रोजी सायंकाळी ४ ते ५ वाजेपर्यंत दिल्लीतील ताज पॅलेस हॉटेलमध्ये प्रार्थना सभा होणार आहे. १२ जून रोजी इंग्लंडमध्ये पोलो खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने संजय कपूर यांचे निधन झाले. ताहिर जासूससह अनेक पापाराझी पेजनी करिश्माचे व्हिडिओ शेअर केले आहेत.

करिश्मा कपूरने २००३ मध्ये संजय कपूरशी लग्न केले. या जोडप्याला समायरा (१९) आणि कियान (१३) ही दोन मुले आहेत. लग्नाच्या काही वर्षांनंतर त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. त्यानंतर २०१६ मध्ये करिश्मा आणि संजयचा पूर्णपणे घटस्फोट झाला.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

आमिर-सलमानची जोडी पुन्हा एकत्र दिसणार का? ‘अंदाज अपना अपना २’ बद्दल आमिरने दिली मोठी अपडेट
आपल्या क्रश सोबतच पडद्यावर पहिले चुंबन घेण्याचे भाग्य लाभलेल्या या अभिनेत्रीला तुम्ही ओळखले का; जाणून घ्या संपूर्ण स्टोरी…  

हे देखील वाचा