बॉलिवूडमधील सर्वात जुने आणि प्रतिष्ठेचे घराणे म्हणून ‘कपूर’ कुटुंब ओळखले जाते. अगदी पृथ्वीराज कपूर यांच्यापासून चालत आलेला सिनेमांचा वारसा आज करीना कपूरपर्यंत अविरत चालू आहे. याच घराण्यातल्या मुलीचा सामना छोटे विचार असणाऱ्या लोकांशी झाला होता. इंडस्ट्रीमध्ये लोलो नावाने प्रसिद्ध असलेल्या करिश्मा कपूरने तिचे वैवाहिक आयुष्य अनेक समस्यांमुळे तोडले. करिश्मा कपूरने २०१६ साली तिचा पती असलेल्या संजय कपूरपासून घटस्फोट घेतला. या घटस्फोटानंतर चार वर्षांनी करिश्माने अनेक खुलासे केले होते.
करिष्माच्या वैयक्तिक जीवनामध्ये अनेक चढ- उतार आले. मोठ्या पडद्यावर आपल्या अभिनयाने प्रेक्षकांवर छाप पाडणाऱ्या करिश्माला तिच्या आयुष्यात पाहिजे ते सुख मिळाले नाहीत. करिश्मा कपूर आणि अभिषेक बच्चन यांचा झालेला साखरपुडा मोडला होता, हे तर सर्वश्रुत आहे. त्यानंतर करिश्माने दिल्लीस्थित संजय कपूर या उद्योगपतीसोबत सप्टेंबर २००३ मध्ये लग्न केले. करिश्माने तिचा हा निर्णय चुकल्याचे एका मुलाखतीमध्ये मान्य केले.
या मुलाखतीमध्ये तिने सांगितले होते की, “माझी सासू माझ्यावर हात उचलायची, तर माझा नवरा माझ्या खर्चांसाठी भावाकडून पैसे घ्यायचा. संजयने माझ्यासोबत लग्न फक्त मी एक प्रसिद्ध अभिनेत्री होते म्हणूनच केले. जेव्हा मी आणि तो आमच्या हनिमूनला गेलो होतो, तेव्हा त्याने त्याच्या मित्रांसोबत माझी बोली लावली होती, आणि मला त्याच्या मित्रांसोबत एक रात्र घालवण्यासाठी बळजबरी केली होती. संजय नेहमी माझ्यावर हात उचलायचा. त्याने मारल्यानंतर मी माझ्या जखमा आणि मारल्याचे निशाण मेकअपने लपवायची. जेव्हा गोष्टी हाताबाहेर गेल्या, तेव्हा मी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली.” २०१४ साली करिश्मा आणि संजय यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्यानंतर २०१६ ला त्यांना घटस्फोट मिळाला होता.
आपल्या मुलीच्या लग्नावर अभिनेते रणधीर कपूर म्हणाले, “मला हे लग्न सुरुवातीपासूनच मान्य नव्हते. मी फक्त माझ्या मुलीच्या आनंदासाठी तयार झालो होतो. संजय खूप खालच्या पातळीवरचा माणूस होता. तो त्याच्या पत्नीचा कधीच आदर करत नव्हता. आम्ही कपूर आहोत. आमच्याबद्दल संपूर्ण जगाला माहिती आहे, त्यामुळे आम्ही कधीच कोणत्या गोष्टीसाठी खास करून पैशासाठी करिश्माचे लग्न त्याच्यासोबत लावून दिले नव्हते. संपूर्ण दिल्लीला देखील माहित आहे, संजय कसा आहे. मला याबद्दल जास्त बोलायचे नाही.”
दरम्यान संजय कपूरने करिश्मावर पैशासाठी लग्न केल्याचा आरोप करत, ती खूप वाईट आई असल्याचे सांगितले होते.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘तिरंगा’ चित्रपटासाठी नानांनी दिला होता नकार; मात्र नंतर ‘ही’ विचित्र अट सांगत भरली त्यांनी हामी
-कपिल शर्माच्या शोमध्ये भोजपुरीच्या सुूपरस्टार्सची धमाल; तर कपिल शर्माचीही बोलती झाली बंद