Thursday, April 18, 2024

कपिल शर्माच्या शोमध्ये भोजपुरीच्या सुूपरस्टार्सची धमाल; तर कपिल शर्माचीही बोलती झाली बंद

टेलिव्हिजनवर कपिल शर्मा हा एक असा कॉमेडियन आहे, जो प्रत्येकाला त्यांच्या प्रश्नांची चोख उत्तरे देतो. ज्यामुळे समोरच्याची बोलती बंद होते. त्यामुळे त्याच्यासमोर कोणालाही तग धरून राहणे कठीण आहे. मग कोणताही स्टार असो, कपिल शर्माचा सेन्स ऑफ ह्युमर एवढा चांगला आहे की, तो कोणाच्याही प्रश्नाला मस्तीत सडेतोड उत्तर देत असतो. परंतु या वेळेस काहीतरी वेगळे चित्र पहायला मिळाले आहे. ‘द कपिल शर्मा शो’मध्ये भोजपुरी स्टार्सची एंट्री झाली आहे. यामध्ये, खेसारी लाल यादव, आम्रपाली यादव, राणी चटर्जी आणि निरुहुआ हे आले होते. तेव्हा मात्र त्याचा हा सेन्स ऑफ ह्युमरचा फॉर्म्युला काहीच कामी आला नाही. उलट त्यालाच त्यांच्या समोर शांत बसावे लागले.

खेसारी लाल असो किंवा भोजपुरीचा इतर कोणी कलाकार असो, ते त्यांच्या अंदाजासाठी सर्वत्र प्रसिद्ध आहेत. खास करून खेसारी लाल यादव. अगदी तळागाळातून पुढे येऊन त्याने आज जे यश मिळवले आहे, ते आज सर्वजण पाहतच आहेत. आज त्याने भलेही यशाचे शिखर गाठले असेल, पण आजही त्याच्यातील निरागसता कायम आहे. याच निरागसतेने तो जे काही बोलतो ते ऐकून समोरचा व्यक्ती गप्प राहून फक्त त्याचे बोलणे ऐकतच राहतो. हे भोजपुरीचे काही कलाकार ‘द कपिल शर्मा शो’मध्ये आले होते. मात्र जेव्हा खेसारी लाल बोलायला लागला, तेव्हा कपिल शर्माला गप्प राहावे लागले होते. (Bhojpuri stars come to kapil sharma show, kapil sharma get silence)

खेसारी लाल यादव याने स्टार बनण्याच्याआधी दूध विकण्याचे देखील काम केले आहे. त्याच्या याच दूध व्यवसायासंबंधीचा एक किस्सा निरुहुआने या शोमध्ये सांगितला आहे. तेव्हा असे समजले की, खेसारी लाल हा दुधात पाणी टाकत असायचा. यामुळे तो एक दिवस अडचणीत सापडता सापडता वाचला होता. सोबतच ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये पोहचलेल्या या भोजपुरी स्टार्सने त्यांच्या जीवनातील अनेक मजेशीर किस्से हा शोमध्ये प्रेक्षकांसोबत शेअर केले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-खूपच बदललीय ‘लगान’ सिनेमातील ग्रेसी सिंग; २० वर्षांनंतर अशी दिसतेय आमिर खानची अभिनेत्री

-‘बंगाली ब्युटी’ मौनी रॉयने केले बेडरूममधील फोटो शेअर; कातिलाना अंदाजाने चाहते घायाळ

-‘पितृदिना’निमित्त अभिनेता आयुषमान खुरानाची भावुक पोस्ट; आपल्या नावाशी संबंधित सिक्रेटचाही केला खुलासा

हे देखील वाचा