Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘नागिन’ फेम करिश्मा तन्ना अडकणार लग्नबंधनात, पाहा कोण होतोय तिचा भावी पती?

टेलिव्हिजन अभिनेत्री करिश्मा तन्ना सध्या अभिनयापासून दूर आहे. अंकिता लोखंडेनंतर आता ‘नागिन’ फेम अभिनेत्री करिश्मा तन्ना लग्नबंधनात अडकणार आहे. अंकिता लोखंडने मंगळवारी (१४ डिसेंबर) लग्न केल्यानंतर करिश्माच्या लग्नाच्याही चर्चा होऊ लागल्या होत्या. ती आता लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्यामुळे ती व तिचा बॉयफ्रेंड सध्या खूपच चर्चत आहे.

जवळपास २८ हून अधिक मालिकांमधे छोटे मोठे रोल केलेल्या करिश्माचा (Karishma Tanna) जन्म १९८३ साली मुंबईत झाला आहे. तिचे सध्याचे वय ३७ वर्ष असून ती तिचा बॉयफ्रेंड वरुण बंगेरासोबत (Varun Bangera) लग्न करणार असल्याचे कळते. नवीन वर्षात अर्थात ५ फेब्रुवारी, २०२२ रोजी करिश्मा आणि वरूण यांचा विवाहसोहळा पार पडणार असल्याचे बोलले जात आहे.

लग्नाबद्दलच्या या वृत्ताला करिश्मा आणि वरुणने अद्यापही दुजोरा दिलेली नाही. वरुणने करिश्मासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोतील केकवर अभिनंदन असे लिहिले आहे. १२ नोव्हेंबरला या दोघांचा साखरपुडा पार पडला असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. माध्यंमातील वृत्तांनुसार, करिश्मा-वरुणच्या लग्नाचे कार्यक्रम ४ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. टीव्ही इंडस्ट्रीमधील जवळच्या मित्रांना आणि नातेवाईकांना करिश्मा-वरुण हाय फाय रिशेप्शन देणार असल्याची चर्चा माध्यमांमध्ये रंगली आहे. हे रिशेप्शन ६ फेब्रुवारीला होण्याची शक्यता आहे. (Karishma Tanna to marry boyfriend Varun Bangera on February 5)

करिश्मा गेले अनेक महिन्यांपासून वरुणसोबत डेट करत होती. वरुणसोबत रिलेशनमध्ये येण्याअगोदर करिश्मा पर्ल वी पुरीला डेट करत होती. काही दिवसातच त्या दोघांचा ब्रेकअप झाला आणि ते वेगळे झाले. पर्लच्या रिलेशनअगोदर करिश्मा उपेन पटेलच्या प्रेमात होती. २०१४ मध्ये बिग बॉसच्या आठव्या सिझनच्या दरम्यान करिश्माची उपेनसोबत ओळख झाली होती. २०१६ पर्यंत दोघे एकमेकांना डेट करत होते. दोन वर्षे नात्यात राहिल्यानंतर त्यांचा ब्रेकअप झाला. दोन ब्रेकअपनंतर करिश्माची वरुणसोबत कॉमन फ्रेंडच्या घरी ओळख झाली. सुरुवातीला दोघांमध्ये चांगली मैत्री होती. नंतर या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.(nagin serial)

वरुण मुंबईत रियल स्टेट बिझनेसमन आहे. करिश्माने २००१ मध्ये आपल्या फिल्मी कारकिर्दीला सुरूवात केली होती. सुरूवातीला ती ‘सास भी कभी बहू’ थी या मालिकेत काम करत होती. करिश्मा अनेक रियालिटी शो मध्ये पाहायला मिळाली आहे. ‘खतरों के खिलाडी’ सारख्या प्रसिद्ध रियालिटी शो ची ती विजेती आहे. दरम्यान, एकता कपूरच्या ‘नागिन’ मालिकेत मुख्य भूमिकेत काम करत असताना करिश्माने चाहत्यांची मने जिंकली होती. तीने काही हिंदी चित्रपटांतही काम केले आहे. परंतु तिला म्हणावे असे यश मिळाले नाही.

हेही वाचा-

हे देखील वाचा