अखेर अंकिता लोखंडे चढली बोहल्यावर! स्टेजवर जातात अभिनेत्रीला अश्रू अनावर


बहुचर्चित कपल अंकिता लोखंडे आणि विकी जैन अखेर विवाहबंधनात अडकले आहेत. ढोल-ताशांच्या गजरात ग्रँड हयात पोहोचलेल्या विकी जैनने, वधू अंकिता लोखंडेसोबत सात फेरे घेतले. सर्वप्रथम दोघांनी एकमेकांना पुष्पहार घातला. यावेळी अंकिताही थोडी भावूक दिसली. लग्नाचे विधी पूर्ण करतानाचा दोघांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गोल्डन आणि ऑफ व्हाइट रंगाच्या लेहेंग्यात अंकिता खूपच सुंदर दिसत आहे. तसेच लेहेंग्यासह तिने घातलेले दागिने तिच्या सौंदर्यात आणखी भर घालत आहेत. शिवाय विकी जैनही शेरवानीमध्ये बऱ्यापैकी देखणा दिसत आहे. 

या आनंदाच्या खास प्रसंगी अंकिता आणि विकीच्या आजूबाजूला मित्र आणि कुटुंबीयांनी गजबज पाहायला मिळाली. आयुष्याचा नवा अध्याय सुरू करताना, विकी आणि अंकिताला त्यांच्या प्रियजनांचा पाठिंबा आणि आशीर्वाद हवे होते आणि हेच कारण आहे की, त्यांनी लॉकडाऊनमध्ये लग्न केले नाही. दोघेही बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. लग्नाआधीच या जोडप्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालू लागले होते.

भावुक झाली अंकिता
वधूच्या वेशात आलेली अंकिता जेव्हा जयमालासाठी स्टेजवर पोहोचली, तेव्हा तिचे डोळे पाणावले होते. यानंतर विकीने तिला मिठी मारून शांत केले. जयमालानंतर पुन्हा लग्नाचे विधी सुरू झाले. अंकिता आणि विकीचे चाहते या लग्नासाठी खास हॅशटॅग ट्रेंड करत आहेत. अन्वी असे या जोडप्याचे नाव ठेवले गेले आहे आणि त्यामुळे सोशल मीडियावर #AnvikiShaadi असे हॅशटॅग ट्रेंड केले जात आहे.

कोण आहे विकी जैन
अंकिताचा पती विकी जैनबद्दल सांगायचे झाले तर, विकी जैन बिलासपूर, छत्तीसगड येथील एक यशस्वी बिझनेस मॅन आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अंकिता आणि विकी दोघे कॉमन फ्रेंड्सच्या माध्यमातून एका पार्टीत भेटले आणि २०१८ मध्ये त्यांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी त्यांचे नाते लपून ठेवले असले, तरी गेल्या दोन वर्षांत ते अनेकदा एकमेकांसोबतचे फोटो शेअर करताना आणि कठीण काळात एकमेकांना साथ देताना दिसले.

हेही वाचा-

पवन सिंग आणि अक्षरा सिंगने बर्फाळ मैदानात आपल्या रोमान्सने लावली आग

एका चापटीने बदलवले होते हिंदी चित्रपटसृष्टीतील राज कपूर यांचे नशीब, कमी वयातच मिळाली ‘शोमॅन’ ओळख

समुद्राच्या पाण्यात चील मारताना दिसली इलियाना डिक्रुझ, मालदीवमधील फोटो आले समोर

 


Latest Post

error: Content is protected !!