Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

बाॅलिवूडमधील आणखी एका जोडीने बांधली लगीनगाठ; फोटोत दिसतायेत एकदम झकास!

अभिनेत्री करिश्मा तन्ना (Karishma Tanna) हिच्या चाहत्यांसाठी आजचा दिवस खूप खास आहे. करिश्मा तन्ना हिने शनिवारी (५ फेब्रुवारी) वरुण बंगेरासोबत सात फेरे घेतले आहेत आणि एकमेकांना कायमचा जीवनसाथी म्हणून निवडले आहे. करिश्मा तन्ना आणि वरुण बंगेरा यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. लग्नाच्या फोटोंमध्ये करिश्मा आणि वरुण एकत्र खूपच सुंदर दिसत आहेत.

लग्नाचे फोटो व्हायरल
स्वत: अभिनेत्रीने आणि काही फॅन पेजेसने या लग्नाचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. ज्यामध्ये हे कपल खूपच सुंदर दिसत आहे. त्याचवेळी दोघांनीही पॅपराझींना हसतमुखाने पोझ देत सर्वांची मनं जिंकली. करिश्मा आणि वरुणच्या लग्नाचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. करिश्माच्या फॅन पेजवरही फोटोसोबत व्हिडिओ देखील शेअर केले जात आहेत. (karishma tanna varun bangera wedding first photos viral on social media)

नोव्हेंबरमध्ये केला होता साखरपुडा
करिश्मा तन्ना आणि वरुण बंगेरा यांची गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये साखरपुडा केला होता. करिश्मा-वरूणचे फोटो-व्हिडिओ चाहत्यांनकडून खूप पसंत केले जात आहे. तसेच चाहते त्यांचे भरभरून अभिनंदन करत आहेत. एकता कपूरपासून ते इतर अनेक कलाकारांनी या जोडप्याचे फोटो शेअर केले आहेत. महत्त्वाचे म्हणजे, करिश्मा आणि वरुण क्वचितच सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करतात.

हेही वाचा :

हे देखील वाचा