Wednesday, July 3, 2024

कर्नाटक वन विभागातील हत्तीच्या पिल्लाला देण्यात आले सुपरस्टार पुनीत राजकुमारचे नाव, सदैव राहणार आठवणीत

मागील महिन्यात २९ ऑक्टोबरला अवघ्या सिनेसृष्टी शोकसागरात बुडाली होती. कारण, दाक्षिणात्य अभिनेता पुनीत राजकुमारने अवघ्या ४६ व्या वर्षीय या जगाचा निरोप घेतला होता. यावेळी अनेक दिग्गज कलाकारांनी पुनीतला श्रद्धांजली वाहिली होती. आताही त्याच्या मृत्यूच्या धक्क्यातून चाहते सावरले नाहीत. अशातच आता पुनीतबाबत मोठी बातमी समोर येत आहे. कर्नाटकच्या शिवमोग्गा तालुक्यातील सक्रेबैलू येथील अभिमन्यू नावाच्या हत्तीच्या पिल्लाला पुनीत राजकुमारचे नाव देण्यात आले आहे.

हत्तीच्या मुलाला दिले पुनीत राजकुमारचे नाव
वनविभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, काही महिन्यांपूर्वी सुपरस्टार पुनीत राजकुमार एका सरकारी जाहिरातीचे शूटिंग करण्यासाठी जंगलात पोहोचला होता, जिथे त्याने अभिमन्यू हत्तीच्या २ वर्षांच्या पिल्लासोबत खूप मजा केली होती. त्यामुळे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिवंगत अभिनेते पुनीत राजकुमारच्या नावावरून हत्तीच्या बाळाचे नाव ठेवले आणि त्याला श्रद्धांजली वाहिली. (Karnataka Forest Department Given Elephant Baby Name of Late Superstar Puneeth Rajkumar)

पुनीतने घालवले २ तास
शिवमोग्गा जंगलाचे संरक्षक नागराज यांनी सांगितले की, पुनीत राजकुमार जवळपास २ तास आमच्यासोबत राहिला आणि त्याने गोष्टी जाणून घेतल्या. वन कर्मचारी आणि जनतेच्या विनंतीनंतरच त्यांनी हत्तीचे नाव अभिनेत्याच्या नावावर ठेवले. पुनीत राजकुमारच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. त्यानंतर अभिनेत्यांपासून राजकारण्यांपर्यंत सर्वांनीच त्यांना श्रद्धांजली वाहिली.

कन्नड चित्रपटांमध्ये दिले खास योगदान
पुनीत राजकुमार हा एक चांगला अभिनेता तर होताच, पण पार्श्वगायक, टीव्ही प्रस्तुतकर्ता आणि निर्माता देखील होता. कन्नड चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी तो ओळखले जातो. त्यांनी २९ हून अधिक चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेता म्हणून काम केले. पुनीतने त्याच्या करिअरची सुरुवात बालकलाकार म्हणून केली होती. ‘वसंत गीता’, ‘भाग्यवंता’, ‘चालिसुआ मोडगालू’ यांसह अनेक चित्रपटांमधील त्याच्या दमदार अभिनयाचे चाहत्यांनी कौतुक केले.

पुनीत आज या जगात नसला, तरीही तो सदैव प्रेक्षकांच्या आठवणीत राहील.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सुर्याचा दमदार ड्रामा चित्रपट आहे ‘जय भीम’, पाहण्यापूर्वी वाचा रिव्ह्यू

-‘जय भीम’ चित्रपटातील ‘त्या’ सीनवर प्रकाश राज यांचे प्रत्युत्तर; म्हणाले, ‘लोकांना आदिवासींचे हाल दिसले नाहीत’

-वडिलांची परवानगी मिळाली असती, तर सलमान असता जुहीचा पती; लग्नासाठी हात मागायलाही गेला होता, पण…

हे देखील वाचा