Monday, July 1, 2024

हिजाबच्या वादात कंगनाच्या पोस्टवर शबाना आझमी यांचे वक्तव्य, म्हणाल्या ‘भारत धर्मनिरपेक्ष लोकशाही…’

बॉलिवूडमध्ये ‘पंगा क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री कंगना रणौत तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सतत चर्चेचा विषय बनत असते. अभिनेत्री प्रत्येक मुद्द्यावर आपले मत निर्दोषपणे व्यक्त करते. याच स्टाईलमुळे ती सतत चर्चेत असते. या सगळ्याशिवाय अभिनेत्री सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. अलीकडेच कर्नाटकातील एका महाविद्यालयातून सुरू झालेला हिजाबचा वाद आता देशभर गाजला आहे. राजकीय व्यक्तींपासून ते बॉलिवूड स्टार्सनीही यावर आपलं मत मांडलं आहे. त्यानंतर कंगनानेही हिजाबच्या वादावर तिची प्रतिक्रिया दिली आहे. हिंमत दाखवायची असेल, तर अफगाणिस्तानात बुरखा न घालून दाखवा, असे कंगना म्हणाली होती. कंगनाच्या या वक्तव्यावर आता शबाना आझमी यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

शबाना आझमी यांनी काय लिहिले आहे? 

कंगनाच्या (Kangana Ranaut) पोस्टला उत्तर देताना शबाना आझमी (Shabana Azmi) यांनी लिहिले की, “मी जर चुकत असेल, तर सुधारवा, पण अफगाणिस्तान हे एक धर्मशासित राज्य आहे. पण मी शेवटची तपासणी केली तेव्हा भारत धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक होता.?”

हेही पाहा : इरफान नसता, तर ‘पुष्पा’ सिनेमाला ‘भंवर सिंग’ मिळालाच नसता । Story of Fahad Fazil

कंगनाने काय लिहिले? 

कंगना रणौतने लिहिले की, “जर तुम्हाला हिम्मत दाखवायची असेल, तर अफगाणिस्तानात बुरखा घालू नका, स्वतःला पिंजऱ्यातून मुक्त करायला शिका.”

जावेद अख्तर यांनीही दिली प्रतिक्रिया 

जावेद अख्तर यांनी ट्वीट करत लिहिले की, “मी कधीही हिजाबच्या बाजूने नव्हतो. मी अजूनही तिथेच कायम आहे, त्याचवेळी मुलींच्या त्या लहान गटाला धमकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या गुंडांचा मी निषेध करतो. हे त्यांचे ‘पुरुषत्व’ आहे का? ही खेदाची गोष्ट आहे.”

येथून वादाला झाली सुरुवात 

जानेवारीमध्ये उडुपीच्या ए कॉलेजमधील काही विद्यार्थिनींना हिजाब परिधान केल्याबद्दल वर्गात प्रवेश नाकारण्यात आला होता. या प्रकरणाबाबत एका विद्यार्थिनीने कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल करून हिजाब घालून वर्गात जाण्याची परवानगी मागितली होती.

हेही वाचा –

 

हे देखील वाचा