Tuesday, April 16, 2024

कार्तिक आर्यनने त्याच्या लव्ह लाईफबद्दल केला खुलासा, ‘या’ को-स्टारला केलंय त्याने डेट

कार्तिक आर्यनने (Kartik Aaryan) अलीकडेच एका स्टारला डेट करताना कोणकोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो, हे सांगितले. कार्तिक म्हणाला की, त्याच्यासाठी नात्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘परस्परांचा आदर’. युट्यूबर रणवीर अल्लाबदियाच्या पॉडकास्टमध्ये कार्तिकने कबूल केले की, त्याने फिल्म इंडस्ट्रीतील एकीला डेट केले आहे. मात्र त्याने त्याच्या जोडीदाराचे नाव उघड करण्यास नकार दिला. 

दोन कलाकारांसाठी नाते टिकवणे कठीण आहे का, असे विचारले असता कार्तिक म्हणाला, “ते अवलंबून प्रत्येकावर असते. हे या व्यवसायाशी संबंधित नाही. हे एक व्यक्ती-व्यक्तीशी संबंधित आहे. यावेळी तुम्ही एकमेकांसोबत असता.” (karthik aaryan revealed about his love life told that he has dated the costar)

चित्रपटसृष्टीत रिलेशनशिपमध्ये फसवणूक होणे हे खरे आहे का? असे विचारले असता यावर कार्तिक म्हणाला, “जर दोन कलाकार एकत्र काम करत असतील आणि कॉफीसाठी बाहेर गेले, तर ते एकत्र ‘स्पॉट’ झाले आहेत, असे सांगितले जाते. लोक त्यांच्याबद्दल बोलू लागतात. मग मी बाहेर जायचं बंद करू का? जर दोन लोक फक्त मित्र म्हणून भेटत असतील तर काय? जर चार लोक बाहेर गेले, तर ते फक्त दोघांचे फोटो प्रकाशित करतील. असेच घडते. आणि यामुळे जेव्हा तुम्हाला नंतर इतर कोणासोबत तरी ‘स्पॉट’ केले जाते, तेव्हा ते विचित्र वाटते.”

कार्तिक म्हणाला की, अशाप्रकारेच गप्पांची ‘गडबड’ बनवतात. तो जान्हवी कपूरला डेट करत असल्याच्या अफवा काही महिन्यांपूर्वी समोर आल्या होत्या, जेव्हा ते गोव्यात एकत्र दिसले होते. दोघे ‘दोस्ताना २’ मध्ये काम करणार होते, पण धर्मा प्रॉडक्शनशी मतभेद झाल्याने कार्तिकने हा प्रोजेक्ट सोडला. 

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा