बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन(Kartik Aaryan) काही महिन्यांपूर्वी ‘फ्रेडी‘ या चित्रपटावर काम करत होता. त्याचा हा चित्रपट सिनेमागृहात नाही, तर डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे पोस्टरसुद्धा समोर आलं आहे. फ्रेडी या अभिनेत्याच्या चित्रपटातील त्याचा फर्स्ट लूक काही दिवसांपूर्वी शेअर करण्यात आला होता. कार्तिकच्या फ्रेडी (Freddy) या आगामी चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात कार्तिक हा हटके भूमिका साकारत आहे. कार्तिकच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
टिझर ट्विटरवर शेअर करताना कार्तिक आर्यनने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘फ्रेडीच्या जगात तुमचे स्वागत आहे. 2 डिसेंबर 2022 पासून अपॉइंटमेंट खुल्या असतील. अभिनेत्याचा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टारवर 2 डिसेंबर रोजी प्रदर्शित होईल. या चित्रपटात आलिया फर्निचरवाला कार्तिक आर्यनसोबत दिसणार आहे. फ्रेडीचे दिग्दर्शन शशांक घोष यांनी केले असून एकता कपूरने निर्मिती केली आहे.
1 मिनिट 13 सेकंदाच्या टीझरमध्ये कार्तिक आर्यन पहिल्यांदा टेबलवर बसून खेळण्यासारखे विमान रंगवताना दिसत आहे. पुढे कार्तिक आर्यन रुग्णाचा दात पाहतो आणि त्याच्यावर उपचार करतो असतो. एका दृश्यात तो अचानक जंगलात नाचू लागतो तर कधी हसायला लागतो. शेवटी तो एका माणसाचा मृतदेह घेऊन जाताना दिसतो. टीझर पाहून अंदाज बांधता येतो की यात खूप थरार पाहायला मिळणार आहे.
फ्रेडी हा चित्रपट थ्रिलर आणि ऍक्शन कथानकावर आधारित आहे. कार्तिकसोबतच या चित्रपटात अभिनेत्री आलाया.एफ देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. कार्तिक हा या चित्रपटात एका डेंटिस्टच्या भूमिका साकारणार आहे. टीझरसोबतच चित्रपटाच्या रिलीज डेटची देखील घोषणा करण्यात आली आहे. कार्तिक आर्यनचा हा चित्रपट सिनेमागृहात नाही, तर डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. कलाकार पुन्हा एकदा धमाका करण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्याच्या आगामी चित्रपट फ्रेडीचा टीझर डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज करण्यात आला आहे. ट्रेलरमध्ये कार्तिकची स्टाइल अगदी वेगळ्या पद्धतीने पाहायला मिळत आहे. यामध्ये कार्तिक आर्यन डेंटिस्ट बनून लोकांना घाबरवायला येत आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
काय ती अदा, मलायका अरोराने दाखवली सौंदर्याची जादू!
अरे वाह! अनुपम खेरने अमिताभ बच्चनची केली मालिश; बिग बी म्हणाले, ‘हाय अनुपम..’