बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन आणि क्रिती सेनन लवकरच पुन्हा एकत्र रोमान्स करताना दिसणार आहे. रोहित धवन दिग्दर्शित ‘शहजादा’ चित्रपटात कार्तिक आणि क्रिती दिसणार आहे. दरम्यान, या चित्रपटाच्या निर्मात्यांनी ‘शहजादा’च्या प्रदर्शनाबाबत मोठा खुलासा केला आहे. स्टारकास्टने चित्रपटाचे पोस्टर शेअर करत सांगितले की, ‘शेहजादा’ चित्रपट पुढील वर्षी ४ नोव्हेंबर २०२२ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल.
या चित्रपटाचे शूटिंग १३ ऑक्टोबरपासून मुंबईत सुरू झाले आहे. चित्रपटासाठी मोठा सेट लावण्यात आला असून, हा ‘शहजादा’ सिनेमा एक ऍक्शन पॅक्ड म्युझिकल ड्रामा असणार आहे. मुंबई व्यतिरिक्त या चित्रपटाचे शूटिंग दिल्लीतही होणार आहे. ‘शहजादा’ सिनेमाला संगीत प्रसिदग संगीतकार प्रीतम देणार असून, या चित्रपटात परेश रावल, मनीषा कोईराला, रोनित रॉय आणि सचिन खेडेकर सहाय्यक भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचा लोगो शेअर करताना कार्तिक आर्यनने लिहिले की, “शहजादा, जगातील सर्वात गरीब प्रिन्स.”
या चित्रपटाचे निर्माते भूषण कुमार म्हणाले की, “बऱ्याच काळापासून माझी खूप इच्छा होती की, मी कौटुंबिक ऍक्शन-पॅक्ड म्युझिकल फिल्म तयार करावी. मला ही संधी रोहित धवन, अल्लू अलविंद आणि अमन गिल यांच्या ‘शहजादा’च्या माध्यमातून मिळाली आहे. आशा आहे की, प्रत्येक जण हा सिनेमा करण्यासाठी उत्तम प्रयत्न करेल.” निर्माता अमन गिल यांनी सांगितले की, “रोहित गेल्या एक वर्षापासून ‘शहजादा’वर काम करत आहे. त्याने हा चित्रपट मोठा आणि भव्य करण्याचा प्रयत्न केला आहे.”
डेव्हिड धवनचा मुलगा आणि वरुण धवनचा भाऊ रोहितचा शेवटचा दिग्दर्शित चित्रपट २०१६ साली आलेला ‘डिशूम’ होता. या चित्रपटात वरुण धवन आणि जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत होते, तर अक्षय कुमारने कॅमिओ केला होता. रोहितने २०११ मध्ये ‘देसी बॉईज’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले. या चित्रपटात अक्षय आणि जॉन मुख्य भूमिकेत होते. कार्तिकने नुकतेच ‘फ्रेडी’चे शूटिंग पूर्ण केले असून, त्याचा ‘भूल भूलैया २’ पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे. त्याचवेळी, ‘धमाका’ सिनेमा नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होणार आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
–किशोर कुमार यांना आधीच लागली होती मृत्यूची चाहूल, म्हणूनच त्यांनी…
–बिग बॉसच्या घरात डोनल बिष्ट सदस्यांच्या निशाण्यावर, ‘या’ सदस्यांनी घेतला तिचा क्लास