Wednesday, April 30, 2025
Home बॉलीवूड रस्त्यावर लोकांना थांबवून थांबवून फुलं देताना दिसला कार्तिक आर्यन, पण काय आहे कारण?

रस्त्यावर लोकांना थांबवून थांबवून फुलं देताना दिसला कार्तिक आर्यन, पण काय आहे कारण?

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) सध्या त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत आहे. अलीकडेच, कार्तिक आर्यनचा ‘धमाका’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला, ज्याला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. अशातच बॉलिवूडचा चॉकलेट बॉय कार्तिक आर्यनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तो सर्वांना थांबवून रस्त्यावर फुले वाटताना दिसत आहे. हे वाचून तुम्हाला वाटेल की, आता याला काय झालं?

कार्तिकचा व्हिडिओ व्हायरल
कार्तिक आर्यनने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये कार्तिक एका गाण्याचे शूटिंग करत आहे आणि यासाठी तो रस्त्यावर सर्वांना थांबवून फुले देत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, कार्तिक आधी एका मुलीला आणि नंतर दुसऱ्या मुलीला फुल देत आहे. (kartik aaryan distributing flowers to everyone know the reason behind it)

खरं तर हा व्हिडिओ ‘पती पत्नी और वो’ या चित्रपटाच्या शूटिंगचा आहे. चित्रपटाला २ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हा व्हिडिओ कार्तिक आर्यनने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “असं वाटतंय जसं काय कालचीच गोष्ट आहे.”

मस्ती करताना दिसला अभिनेता
या व्हिडिओमध्ये कार्तिक आर्यन मस्तीच्या मूडमध्ये डान्स करताना दिसत आहे. त्याच्यासोबत अनेक डान्सर्सही दिसत आहेत. ड्रेसबद्दल बोलायचे झाले तर, कार्तिकने पांढरा कोट आणि काळ्या पॅन्टसह पांढरा शर्ट घातला आहे.

‘या’ चित्रपटांमध्ये केलंय काम
कार्तिक आर्यन पडद्यावर अनेक प्रकारच्या भूमिका साकारताना दिसत आहे. त्याच्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाले, तर त्यात ‘प्यार का पंचनामा’, ‘सोनू के टीटू की स्वीटी’, ‘लव आज कल’, ‘लुका छुपी’ आणि ‘पती पत्नी और वो’ यांचा समावेश आहे. त्याच वेळी, अभिनेत्याचा आगामी चित्रपट ‘भूल भुलैया २’ आहे.

हेही नक्की वाचा –

हे देखील वाचा