Saturday, March 15, 2025
Home बॉलीवूड कार्तिक आर्यन नेटफ्लिक्सवर करणार जबरदस्त ‘धमाका’, ट्रेलर पाहून तुमच्याही अंगावर येतील शहारे

कार्तिक आर्यन नेटफ्लिक्सवर करणार जबरदस्त ‘धमाका’, ट्रेलर पाहून तुमच्याही अंगावर येतील शहारे

कार्तिक आर्यन बऱ्याच काळापासून त्याच्या ‘धमाका’ या आगामी चित्रपटाबद्दल चर्चेत आहे. आज या चित्रपटाचा ट्रेलर देखील रिलीझ करण्यात आला आहे, ज्यामध्ये कार्तिक खरोखरच ‘धमाका’ करताना दिसत आहे. या चित्रपटात कार्तिक एका अँकरची भूमिका साकारत आहे, ज्याला एक व्यक्ती फोन करून पुलावरील स्फोटाची माहिती देते. हा ‘धमाका’ कार्तिकचे, तसेच शहराचे आयुष्य हादरवून टाकतो.

चित्रपटात कार्तिकचे नाव अर्जुन पाठक आहे, जो एका चॅनलचा अँकर आहे. ट्रेलरची सुरुवात कार्तिकच्या ‘रेडिओ भरोसा’ नावाच्या रेडिओ शोने होते. रेडिओ चॅनलवर कार्तिकला रघुवीर नावाच्या व्यक्तीचा फोन येतो, जो त्याला सांगतो की तो सीलिंक उडवणार आहे. सुरुवातीला कार्तिक त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाही, पण नंतर त्याला मागून एक स्फोटाचा आवाज येतो आणि अभिनेत्याच्या चेहऱ्याचे रंगच उडून जातात. यानंतर, कार्तिक चॅनेलला सांगतो की, तो या व्यक्तीची १५ मिनिटात मुलाखत घेणार आहे आणि त्यानंतर खऱ्या स्फोटांचा खेळ सुरू होतो. चित्रपटात मृणाल ठाकूर कार्तिकच्या पत्नीची भूमिका साकारत आहे, जी स्वतः एक पत्रकार आहे.

कार्तिक आणि मृणालच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन राम माधवानी यांनी केले आहे. हा चित्रपट १ नोव्हेंबरला नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

कार्तिकबद्दल बोलायचं झालं तर, पहिल्यांदाच अभिनेता एखाद्या चित्रपटात इतकी तीव्र भूमिका साकारताना दिसणार आहे. यापूर्वी कार्तिकने नेहमीच प्रियकर किंवा विनोदी भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाची आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे, याचे शुटींग कार्तिकने अवघ्या १० महिन्यात पूर्ण केलं आहे. अभिनेत्याने चित्रपटासाठी २० कोटी मानधन घेतले आहे. लॉकडाऊन दरम्यान चित्रपटाचे शूटिंग झाले आहे.

 

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आहा कडकच ना! सपना चौधरीचे ‘पतली कमर’ गाणे रिलीझ; मिळाले १० लाखांपेक्षाही अधिक हिट्स

-सपना चौधरीच्या डान्सने चुकवला चाहत्यांच्या काळजाचा ठोका; तुम्ही पाहिला का व्हिडिओ?

-पिवळ्या रंगाच्या पंजाबी ड्रेसमध्ये सपना चौधरीचे देसी स्टाईलमध्ये फोटोशूट, साधेपणाने जिंकले चाहत्यांचे मने

हे देखील वाचा