Friday, April 19, 2024

सपना चौधरीच्या डान्सने चुकवला चाहत्यांच्या काळजाचा ठोका; तुम्ही पाहिला का व्हिडिओ?

हरियाणवी अभिनेत्री सपना चौधरी तिच्या दिलखेच डान्समुळे ओळखली जाते. सपनाने आजवर तिच्या ठुमक्यांनी लाखो चाहत्यांची मने घायाळ केली आहेत. बिग बॉसच्या घरात झळकल्यानंतर ती घराघरात पोहोचली. त्यामुळे तिच्या चाहत्या वर्गात लक्षणीय वाढ झाली आहे. सध्या सोशल मीडियावर सपनाचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

सपना सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसाठी नेहमीच तिचे काही फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. नुकताच तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक रील व्हिडिओ चाहत्यांबरोबर शेअर केला आहे. यामध्ये ती एका पंजाबी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. ‘रंग रा रा री री रा रा’ या पंजाबी गाण्यावर तिने दमदार डान्स करत चाहत्यांच्या काळजाचा ठोकाच चुकवला आहे. अनेकांनी तिच्या या व्हिडिओवर लाईक्सचा वर्षाव केला आहे. तिच्या व्हिडिओला ८० हजारांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत.

तसेच लवकरच तिचे ‘पतली कमर’ हे नवीन गाणे चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. १५ ऑक्टोबरला हे गाणे प्रदर्शित होणार असून अभिनेत्रीने त्याचा टिझर व्हिडिओ देखील काही दिवसांपूर्वी तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला होता. त्याला देखील चाहत्यांची खूप पसंती मिळाली.

तिच्या अभिनयाविषयी बोलायचे झाल्यास, सुरुवातीच्या काळात तिने आपली कला दाखवण्यासाठी अनेकवेळा स्टेजवर सर्व लोकांसमोर डान्स केला आहे. ‘बिग बॉस’ नंतर तिच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. तिचा ‘सॉलिड बॉडी रै’ हा हरियाणवी डान्स व्हिडिओ खूप हिट झाला होता. ‘वीरे की वेडिंग’ या चित्रपटामधील ‘हट जा ताऊ’ या गाण्यामध्ये देखील ती झळकली होती. अभय देयोल अभिनित चित्रपट ‘नानू की जानू’ मध्ये सपनाने एक प्रमुख भूमिका साकारली आणि तिने ‘तेरे ठुमके सपना चौधरी’ या गाण्यामध्ये देखील दमदार डान्स केला आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-दाक्षिणात्य अभिनेत्री अमायरा दस्तूरने बिकिनी फोटोत केला कहर; पाहून चाहताही म्हणाला, ‘देवाने मला…’

-भारीच ना! अक्षरा सिंगचे ‘दिल की पुकार’ गाणे चाहत्यांच्या भेटीला; एकाच दिवसात मिळाले लाखो हिट्स

-Video: दुर्गा पूजेदरम्यान काजोल भावुक; काकांना मिठी मारत लागली रडू

हे देखील वाचा