बॉलिवूडचा हॅडसम हंक अभिनेता कार्तिक आर्यन आपल्या चाहत्यांना प्रभावित करण्याची एकही संधी सोडत नाही. तो नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणासाठी चर्चेत असतो. त्याचे दिवसेंदिवस फॅन्स वाढतच आहेत. तो आपल्या साधेपणाने लोकांची मनं जिंकत असतो आणि त्याचा हाच अंदाज प्रेक्षकांना भुरळ पाडत असतो. कार्तिक सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. तो पुन्हा एकदा आपल्या साधेपणामुळे चर्चेचा विषय बनला आहे. तो एका कार्यक्रमातून परत येत असताना विमानातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
कार्तिक आर्यन(kartik Aaryan) या अभिनेत्याने खूप कमी वेळात प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. तो चाहत्यांची क्रेज बनला आहे. तो चाहत्यांना नेहमी खुश करण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच्या साधेपणाने चाहतेही खूपच प्रभावित होतात. तो त्याच्या चाहत्यांचे कधीच मन दु:खवत नाही चाहत्यांसोबत सेल्फी घेत त्याच्याशी प्रेमानी वागतो आणि त्याचा हाच अंदाज प्रेक्षकांना प्रभावित करतो. त्याचे काही दिवासांपूर्वीच सारा अली खान(sara ali khan) सोबत नाव जोडले गेले होते आणि ओटीटी नामांकन कार्यक्रमात या दोघांच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र यावेळेस कार्तिक पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याचा विमानातील प्रवास करत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये कार्तिक आर्यन एका विमानामध्ये प्रवास करत असताना दिसत आहे. चकित करणारी गोष्ट म्हणजे कार्तिकने बिजनेसच्या ऐवजी इकोनॉमिक क्लासमध्ये प्रवास करत होता तेव्हा कार्तिकला पाहून सगळेच प्रवासी थक्क होतोत. सगळेजन आपले आपले फोन घेऊन कार्तिककडे सेल्फी आणि फोटो घेण्यासाठी जातात. तेव्हा तो आपल्या चाहत्यांचे मन न दु:खवता एकदम उत्साहात चाहत्यांसोबत फोटो आणि सेल्फी काढताना दिसत आहेत. तो सगळ्यांचे खूप चांगल्या प्रकारे अभिवादन करतो आणि आपल्या जागेवर जाऊन बसतो. कार्तिक आर्यनचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून प्रेक्षक त्याचे खूपच कौतुक करत आहेत.
View this post on Instagram
कार्तिक आर्यनचा हा व्हिडिओ सेलिब्रिटी फोटोग्राफी विरल भयानी (Viral Bhayani) याने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये कार्तिक आर्यन फॉर्मल कपड्यामध्ये दिसत आहे, त्याने पांढरा शर्ट आणि पिस्ता कलरची टायसोबत नेवीब्लू रंगाच्या ब्लेजरमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ पाहणारे प्रेक्षक कार्तिकला कमेंट करत कोणी ‘हंबल’ म्हणत आहे, तर कोणी त्याच्या साधेपणाचे कौतुक करत आहेत. कार्तिक आर्यन नेहमी आपल्या साधेपण आणि प्रेमळ स्वभावासाठी चर्चेत येत असतो.
काही दिवसांपूर्वीच अभिनेता कार्तिकला एका एअरपोर्टवर पाहिले होते. तेव्हा तो ‘राष्ट्रीय युवा सम्मेलन 2022’ मध्ये भाग घेण्यासाठी राजस्थान जोधपुर मध्ये पोहोचला होता. कार्तिक जेव्हा जोधपूर हवाई अड्ड्यावर पोहोचतो तेव्हा त्याला एक लहान मुलगा त्याच्या नावाने हाक मारतो तेव्हा तो लगेच त्या मुलाकडे जातो आणि आपल्या छोट्या फॅनच्या भावना न दु:खवता त्याच्यासोबत कही फोटो क्लीक करतो. कार्तिक आर्यन ‘भुल भुलैया2’ पासून त्याची फॅनफोलोवींगमध्ये खूपच वाढ झाली आहे. नवीन कलाकारांपैकी चाहत्यांमध्ये कार्तिक आर्यनची ‘क्रेज’ जास्त असल्याचे दिसून येत आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा
कोण होणार सारा अली खानचा नवरा? करण जोहरच्या प्रश्नावर लाजून लाल झाली अभिनेत्र
‘सज्जन सिंग’ बनून अनुपम श्याम यांनी केले प्रेक्षकांच्या मनावर राज्य, अंतिम क्षणी केलाय आर्थिक तंगीचा सामनाप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता इमरान हाशमी याच्यावर संतप्त जमावाची दगडफेक