Wednesday, July 2, 2025
Home टेलिव्हिजन ‘सुकेशकडून गिफ्ट मिळाले का?’ निकी तांबोळीची पत्रकारांनी उडवली खिल्ली, व्हिडिओ व्हायरल

‘सुकेशकडून गिफ्ट मिळाले का?’ निकी तांबोळीची पत्रकारांनी उडवली खिल्ली, व्हिडिओ व्हायरल

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी तुरुंगात असलेल्या ठग सुकेश चंद्रशेखरशी संबंधित दररोज धक्कादायक खुलासे होत आहेत. आतापर्यंत सुकेशचे नाव जॅकलिन फर्नांडिस (jacqueline fernandez) आणि नोरा फतेहीसह (Nora Fatehi) अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे. याप्रकरणी तपास यंत्रणा ईडीने जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही यांची चौकशी केली आहे. आता या प्रकरणात नवे नाव समोर आले आहे. नोरा-जॅकलिननंतर ‘बिग बॉस 14’ फेम निक्की तांबोळीचेही नाव सुकेश चंद्रशेखर प्रकरणात समोर आले आहे. ईडीच्या आरोपपत्रानुसार सुकेशने बिग बॉस 14 फेम निक्की तांबोळी हिलाही लाखोंच्या भेटवस्तू दिल्या होत्या. सुकेशने अभिनेत्रीला गुच्ची बॅग आणि 3.5 लाख रुपये रोख दिले.

एवढेच नाही तर निक्कीने सुकेश चंद्रशेखरची तुरुंगात भेटही घेतल्याचा दावा आरोपपत्रात करण्यात आला आहे. दरम्यान, निक्की तांबोळीचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओमध्ये निक्की मुंबई विमानतळावर दिसत आहे, त्यानंतर तिला प्रचंड ट्रोल केले जात आहे.

या व्हिडीओमध्ये निक्की थोडीशी  त्रस्त दिसत आहे आणि तिला अस्वस्थ पाहिल्यानंतर नेटिझन्स तिला प्रश्न करण्यापासून रोखू शकत नाहीत. युजर्स निक्कीला तिच्या पर्सबद्दलही प्रश्न विचारत आहेत. तिने घेतलेली बॅग सुकेशची भेट होती का, असा प्रश्न अनेकांनी अभिनेत्रीला विचारला. निक्की तांबोळीचा हा व्हिडिओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी शेअर केला आहे. ज्यावर यूजर्सकडून वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

यावेळी निक्की तांबोळी हिने काळ्या रंगाचा फुल टी शर्ट आणि काळी पॅन्ट घातली होती. त्याने काळ्या रंगाची पर्स हातात घेतली होती आणि फोन हातात धरला होता. निक्कीला पाहून ती नाराज असल्याचे स्पष्ट होते. सुकेश चंद्रशेखर प्रकरणात केवळ निक्कीच नाही तर टीव्ही अभिनेत्री चाहत खन्ना यांचेही नाव पुढे आले आहे. ज्यासाठी उर्फी जावेदनेही अभिनेत्रीला टोमणे मारले आहेत. याआधीही या प्रकरणात जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही यांची नावे चर्चेत आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर

हेही वाचा –पाच वर्षाच्या रिलेशननंतर विघ्नेश आणि नयनताराने थाटला संसार, ‘अशी’ आहे त्यांची लव्हस्टोरी
स्वतःचं घर विकून डॉ. अमोल कोल्हेंनी केली होती ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेची निर्मिती, वाचा त्यांचा जीवनप्रवास
जेव्हा राजेश खन्ना अन् शबाना आझमी करत होते रोमान्स, तेव्हा कादर खान आरके स्टुडिओत बसून…

हे देखील वाचा