Friday, October 17, 2025
Home बॉलीवूड कार्तिक आर्यन लवकरच चढणार बोहल्यावर, पोस्ट शेअर करत म्हणाला…

कार्तिक आर्यन लवकरच चढणार बोहल्यावर, पोस्ट शेअर करत म्हणाला…

सिनेसृष्टीत सध्या लग्नसराई सुरु आहे. एकामागून एक असे अनेक सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकताना दिसत आहेत. अशातच बॉलिवूडचा हँडसम हंक कार्तिक आर्यन (Kartik aryan) लवकरच बोहल्यावर चढणार असल्याची चर्चा जोरदार रंगली आहे.

चार्मिंग पर्सनालिटीमुळे घायाळ होणाऱ्या तरुणींना कार्तिकने मोठा धक्का दिला आहे. नुकतंच त्याने एक पोस्ट शेअर करत लग्नाचा उल्लेख केला आहे. विशेष म्हणजे कार्तिक नेहमी त्याच्या पर्सनल लाईफला लाइमलाइटपासून दूर ठेवतो. पण त्याच्या या पोस्टमुळे त्याच्या चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

कार्तिकने मध्यरात्री सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. ज्यामध्ये त्याने मी लग्नासाठी तयार असल्याचा उल्लेख केला. तसेच त्याने शेअर केलेल्या पोस्टमध्ये कार्तिकचा फोटो पाहायला मिळत आहे.

कार्तिक काळ्या रंगाच्या ब्लेजरमध्ये दिसत आहे. त्याने अनेक पोज देत फोटोशुट केले आहे. हे फोटो शेअर करताना कार्तिकने ‘शादी ready! ‘ अशी कॅप्शन दिली आहे. त्याची ही कॅप्शन पाहून कार्तिक खरचं लग्न करतोय का? त्याची होणारी पत्नी कोण आहे? असं अनेक प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडतायत.

कार्तिकने २०११ मध्ये ‘प्यार का पंचनामा’ मधून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. त्याचा हा पहिलाच चित्रपट हिट ठरला. तेव्हापासून तो लाखो मुलींचा क्रश बनला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

एक खोटारडी.. तर दुसरी कोण असेल? ‘विश्वामित्र’मधील अखेरचे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला
अनुष्का दुसऱ्या बाळाला भारतात नव्हे तर ‘या’ ठिकाणी देणार जन्म, वाचा सविस्तर

हे देखील वाचा