Saturday, June 29, 2024

‘मी पैशांसाठी नाही तर…’, करण जोहरच्या दोस्ताना 2 मधून बाहेर पडण्याचं कारण, कार्तिक स्पष्टच बोलला

बॉलिवूडचा हॅंडसन हंक म्हणून ओळखला जाणारा लोपकप्रिय अभिनेता कार्तिक आर्यन याने खूप कमी वेळात प्रेक्षकांच्या मनात आपले वेगळेच स्थान निर्माण केले आहेत. 2022 साली बॉक्स ऑफिसवर बिग बजेट चित्रपट दणक्यात आदळले आहेत. मात्र एकट्या कार्तिकच्या भूलभुलैया 2’ ने बॉक्सऑफिवर इतिहास रचला. या चित्रपटानंतर अभिनेता पुन्हा एकदा चाहत्यांचे मनोरंजन करण्यासठी सज्ज झाला आहे. सध्या कार्तिकचा आगामी येणारा चित्रपट शेहजादा  याच्या प्रमोशनमध्ये खूप व्यस्त आहे.

कार्तिक आर्यन (Kartik Aryan) याने नव्या पिढीमधील बाकीच्या कलाकारांपैकी खूप लवकर यशाचं शिखर गाठलं आहे. त्याच्या ‘भूलभुलैया 2’ (Bhool Bhulaiyaa 2) चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं होतं. तसंच त्याचा हटके लूक आणि त्याचा साधा स्वभाव प्रेक्षकांना प्रेमात पाडण्यास भाग पाडत असतो. त्याने नुकतंच शेहजादा (Shehzada ) चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान ‘आप की अदालत’ (Aap ki Adalat) या लोकप्रिय कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी त्याने सुत्रसंचालक रजत शर्मा  यांच्याशी खूप मनमोकळेपणाने गप्पा मारल्या होत्या, त्याशिवाय त्याने पहिल्यांदाच करण जोहर (Karan Johar) याच्या ‘दोस्ताना 2’ (Dostana 2) मधूनबाहेर पडण्यामागचं कारण सांगितलं.

मुलाखतीदरम्यान आर्यन म्हणाला की, “मला माझ्या घरच्यांनी एक शिकवण दिली आहे, की जर एक लहान मोठ्यात काही बेबनाव असेल तर लहान व्यक्तीने त्याबद्दल कुठेही वाच्यता करू नये, हे माझ्या घरचे संस्कार आहेत. त्यामुळेच मी याबद्दल काही बोलणार नाही, पण तेव्हा कोविड सुरू होता आणि चित्रपटात बरेच बदल होणार होते, त्यामुळेच मी यातून बाहेर पडलो. बाकी मी पैशांसाठी यातून बाहेर पडलो वगैरे वगैरे या सगळ्या कानगोष्टी आहेत. निश्चितच मी लालची माणूस आहे, पण मी पैशांसाठी नाही तर चित्रपटांच्या स्क्रिप्टसाठी लालची आहे.”

 

View this post on Instagram

 

कार्तिकने करणच्या चित्रपटातून हाबेर पडण्याचं कारण सांगत बिंदास्तपणे माहिती दिली. त्याशिवाय त्याचाया विरोधात पसरलेल्या खोट्या अफवांच देखिल त्याने निराकरण केलं. सांगायचे झाले ‘दोस्ताना 2’ चिपटातून बाहेर पडल्यानंतर अनेक अफवा पसरल्या होत्या की, कार्तिकने करणला चित्रपटासाठी जास्त मानधन मागितल्यामुळे त्याने चित्रपट नकारला होता.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
Viral Video| परीच्या वाढदिवशी प्रार्थना बेहरेने दिल्या हटके शुभेच्छा; म्हणाली, ‘तु माझ्यासाठी…’
शहनाजने लैंगिक शिक्षणाच्या वर्गात केले हाेते ‘हे’ कृत्य, स्वत:च केला खूलासा

 

हे देखील वाचा