Tuesday, March 5, 2024

प्रजासत्ताक दिनानिमित्त कार्तिकने शेअर केला त्याचा चंदु चॅम्पियनमधला नवीन लुक

कार्तिक आर्यन त्याच्या चित्रपटांमुळे नेहमीच चर्चेत असतो. भिलभिलैया 2 पासुन ते सत्य प्रेमकी कथा त्याने अनेक ब्लाॅकबस्टर चित्रपट दिले आहेत.आणि आता तो चर्चेत आहे त्याच्या आगामी चित्रपटामुळे ज्याचं नाव आहे चंंदु चॅम्पियन. चंदु चॅम्पियन हा कार्तिकचा यावर्षीचा पहिला चित्रपट आहे यात तो मुख्य भुमिका साकारणार आहे. हा चित्रपट भारतीय सैन्य दलावर आधारित असणार आहे. त्यामुळे कार्तिकने भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त या चित्रपटातील त्याचा अजुन एक लुक शेअर केला आहे.

कार्तिक आर्यन त्याच्या प्रत्येक भुमिकेने चाहत्यांना वेड लावतो. या भुमिकेतुनही तो त्याच्या चाहत्यांना खुष करणार याचे संकेत दुसत आहेत. त्याने आज इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये कार्तिक भारतीय सैन्य दलाच्या युनिफाॅर्ममध्ये आणि अधिकारी रुबाबात उभा असलेला दिसत आहे. त्याच्या या लुकमधुन तो 90 च्या दशकातील आर्मी ऑफिसर असल्याचे स्पष्ट होत आहे. या फोटोमध्ये त्यच्या चेहऱ्यावर गंभीर भाव देखील दिसत आहेत. ही पोस्ट शेअर करताना त्याने खाली कॅप्शन लिहिले,”चॅम्पियन बनने प्रत्येक भारतीयांच्या रक्तातच आहे. जय हिंद.” पुढे त्याने सर्व चाहत्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देखील दिल्या.

चाहत्यांचा भरभरुन प्रतिसाद
कार्तिकने हा लुक शेअर करताच चाहत्यांनी त्याला भरभरुन प्रतिसाद दिला. चाहत्यांनी या पोस्टवर लाइक चा वर्षाव केला आहे. त्यासोबतंच अनेक चाहते पोस्टवर कमेंट देखील करत आहेत. एका चाहत्याने कमेंट केली आहे की,’एकदम जबरदस्त लुक आहे, चॅम्पियन’ तर अनेकांनी या पोस्टवर कमेंट करत अभिनेत्याला प्रजासत्ताक दिवसाच्या(Republic day) शुभेच्छाही दिल्या.

चंदु चॅम्पियन जुनच्या दुसऱ्या आठवड्यात १४ तारखेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं(Chandu Champion) दिग्दर्शन बाॅलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक कबीर खाननं केलं आहे. हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे. त्यात कार्तिकनं चंदूची प्रमुख भूमिका साकारली आहे.

कार्तिक आर्यनचं वर्कफ्रंट
काही दिवसांपूर्वी कार्तिकनं(Kartik Aryan) त्याच्या वाढदिवसानिमित्तानं करण जोहरसोबतच्या नव्या प्रोजेक्टची घोषणा केली होती. त्यानंतर आता तो संदीप मोदी यांच्या सोबत एका सिनेमात दिसणार आहे. त्याचा हा चित्रपट १५ ऑगस्ट २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन आणि एकता कपूरच्या बालाजी टेलिफिल्म्सच्या यांच्या कोलॅबोरेशनमध्ये बनवला जाणार आहे.

हे देखील वाचा