मागील महिन्यात म्हणजेच २० मे, २०२२ रोजी बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन आणि कियारा आडवाणी अभिनित ‘भूल भुलैय्या २’ सिनेमा प्रदर्शित झाला. प्रदर्शनाच्या दिवसापासूनच हा सिनेमा जागतिक बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डतोड कमाई करत आहे. या सिनेमाला प्रदर्शित होऊन एक महिना उलटला असूनही सिनेमाच्या कमाईत कोणतीही कमतरता आली नाहीये. कार्तिक आर्यनच्या या सिनेमाने अनेक बिग बजेट सिनेमांना मागे सोडले आहे. त्यामुळे निर्मातेही भलतेच खुश आहेत.
आता अशी माहिती समोर येत आहे की, ‘भूल भुलैय्या २’ (Bhool Bhulaiyaa 2) सिनेमाने जागतिक स्तरावर २३०.७५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. तसेच, कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) याचा हा या वर्षातील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर सिनेमा बनला आहे.
दुसरीकडे, बॉलिवूड हंगामाच्या वृत्तानुसार, ‘भूल भुलैय्या २’ सिनेमाचे रविवारी (दि. २६ जून) भारतीय बॉक्स ऑफिस कलेक्शन १८३.२४ कोटी रुपये, एकूण भारतीय बॉक्स ऑफिस कलेक्शन २१८.१४ कोटी रुपये, एकूण परदेशी बॉक्स ऑफिस कलेक्शन ४२.६१ कोटी रुपये आणि एकूण जागतिक बॉक्स ऑफिस कलेक्शन २६०.७५ कोटी झाले आहे. विशेष म्हणजे, सिनेमाचे निर्माते भूषण कुमार यांनी सिनेमाची छप्परफाड कमाई पाहून कार्तिकला ४ कोटींहून अधिक रुपयांची आलिशान कारही भेट म्हणून दिली आहे.
‘भूल भुलैय्या २’ सिनेमातील कार्तिकचे पात्र
‘भूल भुलैय्या २’ या सिनेमात कार्तिक आर्यन याने रूह बाबा याची भूमिका साकारली आहे. तसेच, कियारा आडवाणी हिने मंजुलिकाची भूमिका साकारली आहे. सिनेमात कार्तिक आणि कियारा यांच्याव्यतिरिक्त सौरभ शुक्ला, राजपाल यादव, तब्बू यांच्याही मुख्य भूमिका आहेत.
कार्तिकचे आगामी सिनेमे
कार्तिक आर्यनच्या कामाबाबत बोलायचं झालं, तर तो लवकरच शशांक घोष यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या रोमँटिक थ्रिलर ‘फ्रेडी’ या सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत प्रसिद्ध अभिनेत्री पूजा बेदीची मुलगी अलाया फर्निचरवाला ही मुख्य भूमिकेत असणार आहे. याव्यतिरिक्त कार्तिक ‘शहजादा’, ‘कॅप्टन इंडिया’ यांसारख्या अनेक सिनेमात मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-