Friday, July 5, 2024

‘तुला २० कोटी रुपये देते, माझ्याशी लग्न कर’, चाहतीने लग्नाची मागणी घातल्यावर काय म्हणाला कार्तिक? वाचा

कार्तिक आर्यन हा हिंदी चित्रपट जगतातील आघाडीचा अभिनेता म्हणून ओळखला जातो. आर्यनच्या चित्रपटांचे आणि अभिनयाचे नेहमीच कौतुक केले जाते. आपल्या चित्रपटांबरोबरच तो सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असतो. आपल्या चित्रपटांबद्दल, आगामी कामाबद्दल तो माहिती देत असतो. त्याच्या सोशल मीडियावरील पोस्टची नेहमीच चर्चा पाहायला मिळत असते. सध्या कार्तिक आर्यनने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओवर एका चाहतीने भन्नाट प्रतिक्रिया दिली आहे, ज्याची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. काय आहे हे प्रकरण चला जाणून घेऊ. 

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, अभिनेता कार्तिक आर्यनने (Kartik Aryan) नुकताच बालकलाकार इनायत शर्मासोबत आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये इनायत त्याच्या ‘धमाका’ चित्रपटातील डायलॉग बोलताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत कार्तिकने “गोड अर्जून पाठक,” असे कॅप्शन दिला आहे. यावर अनेक चाहत्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. मात्र, सगळ्यात जास्त चर्चा एका तरुणीच्या भन्नाट ऑफरची होत आहे.

या तरुणीने कार्तिक आर्यनच्या फोटोवर प्रतिक्रिया देताना “माझ्यासोबत लग्न कर,मी तुला २० कोटी रुपये देईन,” अशी थेट ऑफर दिली आहे. यावर कार्तिकनेही प्रतिक्रिया देताना “कधी?” असा प्रश्न या चाहतीला केला आहे. सोबतच त्याने हसण्याचा ईमोजीही शेअर केला आहे. सध्या या जुगलबंदीची सर्वत्र चर्चा सुरू आहे. हा व्हिडिओ सध्या सगळीकडे व्हायरल होत आहे. त्याचे चाहते त्याच्या या व्हिडिओला जोरदार प्रतिक्रिया देत आहेत.

Karthik-Aaryan-Post
Photo Courtesy: Instagram/kartikaaryan

अभिनेता कार्तिक आर्यन याआधीही अशा भन्नाट चाहत्यांमुळे चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्या घराबाहेर काही मुली त्याचे नाव घेत ओरडत असल्याचा व्हिडिओ समोर आला होता. या चाहत्यांनाही तो भेटला होता. कार्तिकच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास तो लवकरच ‘शहजादा’ या चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट अल्लू अर्जुनच्या ‘अला वैकुंठपुरमलू’ चा हिंदी रिमेक आहे. चित्रपटात कार्तिक आर्यनसोबत परेश रावल, रोहित रॉय, सचिन खेडेकर यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. त्याचबरोबर तो ‘भूल भूलैया २’, ‘फ्रेडी’, ‘सत्यनारायण की कथा’ या चित्रपटात झळकणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा