Thursday, April 25, 2024

पैशासाठी नाहीतर ‘या’ गोष्ठीसाठी अक्षय कुमार करतो चित्रपटात काम, मुलाखतीत केला खुलासा

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा नेहमीच त्याच्या वेगवेगळ्या पात्रासाठी ओळखला जोता. तो सध्या बच्चन पांडे या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. ‘बच्चन पांडे’ या चित्रपटात तो गुंडाची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचे तिन्ही गाणे सध्या जोरदार चर्चेत आहेत. बच्चन पांडे या चित्रपटाचा ट्रेलर १८ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला आहे. याच चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान अक्षयनी अस काही बोलला जे प्रत्येकाला थक्क करुन टाकेल. बच्चन पांडे या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान कार्यक्रमात एका प्रश्नला उत्तर देताना अक्षय म्हणाला की, चित्रपटात पैशासाठी काम करत नाही तर त्याच्या पॅशनसाठी काम करतो.

अभिनेता अक्षय कुमारला एका कार्यक्रमात विचारण्यात आले की, तो एका वर्षात इतके चित्रपट कसे करतो. यावर तो म्हणाला, “मी सकाळी काम करणे आणि रविवारी ब्रेक घेणे पसंत करतो. जर तुम्ही रोज काम करत असाल तर अनेक चित्रपट तुमच्या पाइपलाइनमध्ये सहज येतात. कोरोणा महामारीच्या दरम्यान पोलीस, मीडिया फोटोग्राफर आणि सर्वंजन काम करत होते, प्रत्येकाला पैसै कमवावे लागले. आज माझ्याजवळ सर्वकाही आहे. मी चांगले आयुष्यही जगतो, मी न कमविता सहज घरी बसु शकतो. पण त्याच काय ज्यांना काम करायाचे आहे.”

तो पुढे म्हणतो की, “मी आज पैशासाठी नाही तर माझ्या पॅशनसाठी काम करत आहे. ज्या दिवशी मला या क्षेत्रात काम करावसं वाटणार नाही त्याच दिवसापासुन मी काम करणे थांबवेन.” अक्षयचा बच्चन पांडे हा चित्रपट १८ मार्च रोजी थेएटर मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अक्षयने एका गँगस्टरची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात क्रिती सेनन एका डाक्युमेटरी फिल्ममेकरची भूमिका साकारली आहे. तर अर्शद वारसी क्रितीच्या मित्राच्या भूमिकेत दिसत आहे. यासोबतच पकंज त्रिपाठी, जॅकलिन फर्नांडिस, संजय मिश्रा यांच्यासह अनेक कलाकार आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षाकांवरती पाडताना दिसत आहेत. ‘बच्चन पांडे’ व्यतिरिक्त अक्षयकडे ‘रक्षाबंधन’, ‘राम सेतू’, ‘मिशन सिंड्रेला’, ‘गोरखा’ आणि ‘OMG 2’ सारखे अनेक चित्रपट आहेत.

दैनिक बोंबाबोंचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा 

हे देखील वाचा