Sunday, September 8, 2024
Home बॉलीवूड या ‘अभिनेत्रीने काही वर्षापूर्वी सोडली टीव्ही इंडस्ट्री, आज आहे करोडोंच्या घराची मालकीण

या ‘अभिनेत्रीने काही वर्षापूर्वी सोडली टीव्ही इंडस्ट्री, आज आहे करोडोंच्या घराची मालकीण

बॉलीवुडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, जे छोट्या पडद्यावरू बॉलिवूडमध्ये आले पण ते त्यांच्या अभिनयाने लोकांना फारसे आकर्षित करू शकले नाही. परंतु करण सिंह ग्रोवर, सुशांत सिंह राजपूत आणि असे अनेक कलाकार आहेत जे छोट्या पडद्यावरून येऊन त्यांना बॉलीवुडमध्ये त्यांच्या नशीबाने चांगली साध दिली. तर आज आपण अशा एका अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत. जिनेसिरीअल मध्ये चांगली प्रसिद्धी मिळाली पण त्या बॉलीवुडमध्ये फ्लॉप झाली आणि आता इंडस्ट्री पासूनही दूर आहेत.

रोशनी चोपडा हि एक प्रसिद्ध टि.वी अभिनेत्री आहे. तीला आपल्या पहिली टि.व्ही सिरिअल ‘कसम से’ पासूनच प्रसिद्धी मिळाली. पहिल्याच शोमधून प्रसिद्धी मिळाली पण ती सध्या अभिनयापासून दूर आहे. ती सध्या मुंबई एका अलिशान घरात राहते आणि शानदार आयुष्या जगत आहे. तिने अभिनयातून मधून ब्रेक घेऊन ‘चक दे ​​बच्चे’ आणि ‘इंडियाज गॉट टैलेंट’ या रियलिटी शो मध्ये होस्ट म्हणून काम केले आहे.

टि.व्ही शो मधून प्रसिद्धी मिळाल्यावर रोशनी चोपडा बॉलीवुडमध्ये आपली नशीब आजमवली. रोशनीने विक्रम भट्ट यांची फिल्म ‘ फिर से ‘रजनीश दुग्गल याच्यासोबत बॉलीवुड मध्ये आपली शानदार सुरूवात केली. रोशनी ‘ब्रह्म: द इल्यूजन’ याचा पण भाग बनली होती. ज्याच्याच डिनो मोरिया पण होते. पण हि फिल्म बॉक्स ऑफिसवर फ्लॅाप ठरली. रोशनी त्यानंतर शो ‘द ड्रामा कंपनी’ यात दिसली पण तिनेही २०१७ मध्ये हा शो सोडला.रोशनीने मुंबईत आपला स्वतःचा फैशन लेबल ‘ आरसीडीसी इंडिया ‘ सुरू केलं.

रोशनी चोपडा जरी इंडस्ट्री पासून दूर असली, तरी ती कायम सोशल मिडियावर एक्टिव असते. तिने रियलिटी शो ‘ दिल जीतेगी देसी गर्ल ‘मध्ये सहभागी होऊन तिने ‘ देसी गर्ल ‘ किताब जिंकून घेतला.तिचे सोशल मिडियावर 538K फैन फॉलोइंग आहे.रोशनी चोपडा ने फिल्म निर्माते सिद्धार्थ कुमार आनंद सोबत लग्न केलं. नंतर तिला जयवीर आणि रिआन असे दोन मुलं झाली.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

गरोदरपणामुळे दीपिकाने नाकारली आंतरराष्ट्रीय सिरीज? सत्यता आली समोर
एका वर्षात चार चित्रपट करून ट्रोल करणाऱ्यांना अक्षय कुमारचे चोख प्रत्युत्तर

हे देखील वाचा