एकता कपूरचा प्रसिद्ध आणि प्रचंड लोकप्रिय झालेला शो म्हणजे ‘कसोटी जिंदगी की’. २००१ साली सुरु झालेल्या ह्या शो ने लोकप्रियतेचे अनेक रेकॉर्ड मोडले. या शो चे नवीन व्हर्जन देखील प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. ते देखील लोकप्रिय झाले, मात्र जुन्या शो इतकी लोकपर्यत नव्या शोला मिळाली नाही.जुनी ‘कसोटी…’ मालिका त्यातील पात्र लोकांच्या आजही लख्ख स्मरणात आहे. त्याच जुन्या कसोटीचा अनुराग म्हणजेच ‘सिजेन खान’ लवकरच लग्न करणार आहे.
सिजेन खानने नुकतेच एका मुलाखतीत सांगितले आहे की, तो लवकच लग्न करणार आहे. ४३ वर्षीय सिजेन खान मागच्या तीन वर्षांपासून उत्तरप्रदेश मधील अमरोहा येथे राहणाऱ्या मुलीला डेट करत असून, लवकरच ती दोघे लग्न करत आहे. त्याने सांगितले की, २०२० मधेच ते लग्न करणार होते मात्र कोरोनाच्या महामारीमुळे त्यांनी हे लग्न पुढे ढकलले. आता २०२१ मध्ये हे लग्न होणार आहे.
या मुलाखतीदरम्यान त्याने एकदाही त्याच्या मैत्रिणीचे नाव घेतले नाही. त्याला तिच्याबद्दल विचारले असता त्याने सांगितले, ” मला वैयक्तिक गोष्टी बाहेर आणायला आवडत नाही. मी खूप खाजगी जिवन जगत असल्याने माझ्याशी निगडित असलेल्या गोष्टी मी माझ्यापुरता आणि माझ्या कुटुंबापुरताच मर्यादित ठेवतो.”
त्याच्या मैत्रीणीबद्दल सांगताना तो म्हणाला, ” आमची पहिली भेट एका कॉमन मित्रामुळे झाली. त्यानंतर अनेक दिवस आम्ही बोललो मग आम्ही एकेमकांना डेट करायला सुरुवात केली. ती खूप चविष्ट स्वयंपाक करते. मी तिला प्रपोज करताना विचारले होते की, तू मला खूपच आवडते, आणि मला तुझ्या हातचे जेवण आयुष्यभर करायला खूप आवडेल. ‘ती’ खूपच फुडी आहे. तिला वेगवेगळे पदार्थ खायला खूप आवडते. तिची आवडती बिर्याणी मी तिला करून खाऊ घातली होती.”
सिजेन मागील अनेक वर्षांपासून टेलिव्हिजन पासून दूर आहे. मुंबईचा असणारा सिजेन सध्या दुबईमध्ये राहत असून तो पाकिस्तानी आणि मिडल ईस्टच्या मालिकांमध्ये काम करतो.