‘असा’ शूट करण्यात आला होता ‘टायटॅनिक’चा इंटिमेंट सीन, २४ वर्षांनी केला केट विन्सलेटने खुलासा

हॉलिवूडच्या सर्वात प्रतिष्ठित चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘टायटॅनिक’च्या रिलीझला तब्बल २४ वर्षे पूर्ण झाली आहेत. हा चित्रपट १७ डिसेंबर १९९७ रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने लिओनार्डो डिकॅप्रियो आणि केट विन्सलेटला एका रात्रीत प्रसिद्ध केले. या चित्रपटाने ऑस्कर जिंकला. तसेच, अनेक भाषांमध्ये हा चित्रपट डबही करण्यात आला. या चित्रपटात लिओनार्डो डिकॅप्रियो आणि केट विन्सलेट यांच्यातील इंटिमेट सेक्स सीन खूप लोकप्रिय झाला होता. आता अभिनेत्री केट विन्सलेटने या सीनबाबत मौन तोडले असून, याचे शूटिंग कसे झाले ते सांगितले आहे. 

अभिनेत्री केट विन्सलेटने एका मुलाखतीत या रोमँटिक लव्ह मेकिंग सीनबद्दल खुलेपणाने सांगितले आहे. तिने सांगितले की, जेव्हा संपूर्ण सीन शूट झाला तेव्हा ती खूप निराश झाली होती. तर हा सीन शूट केल्यानंतर लिओनार्डो डिकॅप्रियो नॉर्मल होता.

केट म्हणाली, “हा सीन शूट करताना आम्ही आमच्या पात्रांमध्ये होतो. ज्यामध्ये रोझला जॅकवर प्रेम करायचे होते. कॅमेरा रोलिंग बंद झाले, आम्ही उठलो आणि आपापल्या मार्गाने निघालो. हा सीन संपला होता.” पुढे ती म्हणाली, “मला आठवते की, आडवे पडून मी विचार करत होते की, ही लाज वाटण्यासारखी बाब आहे का? पण ते खूप चांगले होते.”

आधीपासूनच होते चांगले मित्र लिओनार्डो आणि केट विन्सलेट या चित्रपटात काम करण्यापूर्वीही चांगले मित्र होते. ते २० वर्षांहून अधिक काळापासून एकमेकांना ओळखतात. वास्तविक, हा सीन इतका लोकप्रिय झाला होता की, आताही प्रेक्षक यासाठी ‘टायटॅनिक’ चित्रपट पाहतात. चित्रपटाच्या सीनमध्ये, जॅक आणि रोझ ‘टायटॅनिक’च्या खालच्या मजल्यावर कारमध्ये सेक्स करताना दाखवले आहेत.

केटने सांगितले की, तिने आणि लिओनार्डोने सीन शूट करण्यापूर्वी एकमेकांच्या लैंगिक जीवनाबद्दल संभाषण केले होते. ती म्हणाली की, “सीनच्या शूटिंगपूर्वी आम्ही हा सीन कसा शूट करायचा याबद्दल बोललो होतो.” केटने सांगितले की, लिओनार्डोने तिला लैंगिक टिप्सही दिल्या आणि त्या कामीही आल्या.

हेही वाचा-

पवन सिंग आणि अक्षरा सिंगने बर्फाळ मैदानात आपल्या रोमान्सने लावली आग

एका चापटीने बदलवले होते हिंदी चित्रपटसृष्टीतील राज कपूर यांचे नशीब, कमी वयातच मिळाली ‘शोमॅन’ ओळख

समुद्राच्या पाण्यात चील मारताना दिसली इलियाना डिक्रुझ, मालदीवमधील फोटो आले समोर

 

Latest Post