Friday, March 14, 2025
Home बॉलीवूड कॅटरिना कैफने केले पती विकी कौशलची टिंगल! म्हणाली, ‘आता लवचिकता आलीय…’

कॅटरिना कैफने केले पती विकी कौशलची टिंगल! म्हणाली, ‘आता लवचिकता आलीय…’

सध्या चित्रपट जगतात नुकतीच लग्न झालेली कॅटरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) यांची क्यूट जोडी सतत चर्चेत आहे. दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामध्ये दोघांचे एकमेकांवरील प्रेम, काळजी नेहमीच दिसत असते. कधी एकत्र फिरताना तर कधी सुट्टीची मजा घेतानाचे फोटो ते सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. आता या दोघांनी एकत्र काम केलेली एक जाहिरात समोर आली आहे, ज्याची सगळीकडे चर्चा रंगली आहे. काय आहे या व्हिडिओमध्ये चला जाणून घेऊ. 

हिंदी चित्रपट जगतातील क्युट कपल म्हणून सध्या  कॅटरिना कैफ आणि विकी कौशल यांची जोडीचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. अनेक महिने दोघांच्या प्रेमप्रकरणाची मोठी चर्चा बॉलिवूडमध्ये रंगली होती. शेवटी या सगळ्या चर्चांना पुर्णविराम देत दोघांनी ९ डिसेंबर २०२१ ला लग्नाच्या बेडीत अडकण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या शाही विवाह सोहळ्याची जोरदार चर्चा पाहायला मिळाली होती. या क्युट जोडीचे अनेक सुंदर व्हिडिओ सोशल मीडियावर झळकत असतात. दोघे एकमेकांचे प्रेम दाखवण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यांचा असाच एका जाहिरातीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर झळकत आहे, ज्याची सगळीकडे चर्चा रंगली आहे.

हा मजेदार व्हिडिओ अभिनेत्री कॅटरिना कैफने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने पती विकी कौशलला टॅग करत त्याचे कौतुक करताना, “आता लवचिकता आली आहे, किती मजेदार जाहिरात आहे,” असे म्हणले आहे. सध्या या व्हायरल व्हिडिओची सर्वत्र चर्चा रंगली आहे. दरम्यान याआधी कॅटरिना कैफ आणि तिच्या सासूचा एक फोटो समोर आला होता. महिल्या दिनानिमित्त शेअर केलेल्या या फोटोत सासू सुनेची ही जोडी खूपच गोड दिसत होती. यामध्ये वीणा कौशल यांनी आपल्या सुनेला प्रेमाने मांडीवर घेतल्याचे दिसत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा –

हे देखील वाचा