Thursday, July 18, 2024

विकी कौशलचा १७ वर्षांपूर्वीचा जुना व्हिडिओ झाला व्हायरल, टीव्ही अभिनेत्रींसोबत फनी डान्स करताना दिसला अभिनेता

जेव्हा कलाकार एका मोठ्या जागी पोहचतात आणि त्यांना लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळते, त्यानंतर अनेकदा त्याच्या संघर्षाच्या दिवसांचे किंवा जुन्या दिवसांचे फोटो व्हिडिओ व्हायरल होताना आपल्याला दिसतात. असे आपण अनेक कलाकारांचे जुने व्हिडिओ किंवा फोटो आपण पाहिले आहेत. मात्र मागील काही दिवसांपासून अभिनेता विकी कौशलचा एक व्हिडिओ जुना तुफान व्हायरल होत आहे. विकी कौशलने त्याच्या प्रभावी आणि जिवंत अभिनयाने स्वतःला या ग्लॅमर विश्वात सिद्ध करत यश मिळवले. खूपच कमी काळात त्याने त्याची तगडी फॅन फॉलोविंग तयार केली असून, तो देखील फॅन्ससोबत जोडले जाण्यासाठी सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतो.

सध्या विकीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत असून, हा व्हिडिओ बघितल्यावर लगेचच लक्षात येते की, तो बऱ्याच वर्षांपूर्वीचा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये टीव्ही अभिनेत्री शिरीन मिर्जा विकी कौशलसोबत दिसत असून, या व्हिडिओमध्ये ते दोघं मजेशीर डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडिओ जवळपास १७ वर्ष जुना असल्याचे सांगितले जात असून, खुद्द शिरीन मिर्जानेच फॅन्सच्या मागणीमुळे हा व्हिडिओ शेअर केला आहे.

हा व्हिडिओ विकी कौशलच्या शाळेच्या दिवसांमधील असल्याचे सांगितले जात आहे. व्हिडिओमध्ये विकी आणि शिरीन कोणते तरी नाटक सादर करताना दिसत असून, ते दोघेही त्यांच्या भूमिकेत गर्क झाल्याचे पाहायला मिळत आहे. दोघांच्या या व्हिडिओवर फॅन्सच्या भरपूर कमेंट्स येत असून, हा व्हिडिओ सर्वांना आवडत असल्याचे देखील यावरून दिसत आहे. विकी आणि शिरीन मिर्जा हे दोघेही एकाच शाळेत शिकायचे. या व्हिडिओमध्ये दोघांचेही अभिनयाचे सुरुवातीचे दिवस दिसत आहे. आज विकी बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेता बनला असून, शिरीन मिर्जा एक लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेत्री आहे.

हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाल्यानंतर विकी कौशलने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर करत लिहिले, “खूप छान जुने अभिनयाच्या शाळेचे दिवस.” विकीने एक महिन्यापूर्वीच कॅटरिना कैफसोबत लग्न केले. त्यांचे लग्न तुफान गाजले. विकी कौशल त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असून, तो सध्या सारा अली खानसोबत एका चित्रपटाची शूटिंग करत आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा