बॉलिवूड कलाकारांमध्ये विविध पुरस्कार आणि मानांकन मिळवण्यासाठी प्रचंड चढाओढ सुरू असते. मोठमोठ्या कार्यक्रमांमध्ये मिळणारे पुरस्कार हे प्रतिष्ठेचे मानले जातात. हे पुरस्कार मिळविण्यासाठी कलाकार पैसा, प्रतिष्ठा, तर प्रसंगी बळाचा वापर करूनही पुरस्कार मिळवण्यासाठी धडपडत असतात.
एका आघाडीच्या अभिनेत्रीने तर पुरस्कार मिळविण्यासाठी ऐनवेळी आयोजित कार्यक्रमात येण्यासाठी नकार दिल्याने मोठी पंचाईत झाली. होती शेवटी तिला पुरस्कार द्यावाच लागला होता. काय आहे सगळं प्रकरण चला जाणून घेऊ. (katrina kaif placed condition in front of show organizer to get award)
कॅटरिना कैफ करणार होती डान्स
हे संपूर्ण प्रकरण २०१२ मधील आहे. स्टार स्क्रीन अवॉर्डने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात कॅटरिना कैफ ‘शीला की जवानी’ या गाण्यावर नृत्य सादर करणार होती. हा संपूर्ण कार्यक्रम थेट प्रक्षेपित होणार होता.
ऐनवेळी कॅटरिनाने दिला होता नकार
कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन करून झाल्यानंतर जेव्हा कॅटरिनाला नृत्य सादर करण्यासाठी तयार राहायला सांगण्यात आले. मात्र तेव्हा तिने स्टेजवर येण्यास नकार दिला, ज्यामुळे सगळेच चकित झाले होते. कॅटरिनाला याबद्दल विचारणाऱ्यात आले, तेव्हा ती म्हणाली की, “तुम्ही मला परफॉर्मेंस करायला बोलविता परंतु पुरस्कार दुसऱ्यांना देता.” त्यावेळी तिने पुरस्कार देणार असाल तरच नृत्य सादर करेन असाही हट्ट धरला होता.
‘अशी’ होती अट
त्यावेळी कॅटरिनाचा ‘राजनीति’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. ज्यामधे नाना पाटेकर, मनोज बाजपेयी अशा अनेक दिग्गज कलाकारांचा समावेश होता. त्या चित्रपटात कॅटरिना कैफच्या भूमिकेची तुलना इंदिरा गांधी यांच्या व्यक्तिरेखेशी केली जात होती. त्यामुळे तिला या भूमिकेसाठी अनेक पुरस्कार मिळतील अशी चर्चा होती.
प्रत्यक्षात मात्र स्टार स्क्रीनच्या कार्यक्रमात एकही पुरस्कार मिळाला नाही, तेव्हा कॅटरिना खुप निराश झाली. तिचा सर्वोत्तम अभिनेत्री या पुरस्कारासाठी निवड होऊनही, हा पुरस्कार विद्या बालनला दिला गेल्याने ती संतापली आणि परफॉर्मेंस करण्यास नकार दिला. आयोजकांनी लाखोंचा खर्च करून कार्यक्रमाचे नियोजन केल्याने, कॅटरिनाचा
हा नकार त्यांना परवडणारा नसल्याने, ऐनवेळी मानांकनात बदल करून तिला विशेष पुरस्कार देण्यात आला. त्यानंतर कॅटरिना कार्यक्रमास तयार झाली.
हा सगळा प्रकार कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या शेखर गुप्ता यांनी एका मुलाखतीत सांगितला होता.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-जेव्हा महेश भट्ट यांना समजवण्यासाठी नग्नावस्थेत रस्त्यावर धावल्या होत्या परवीन बाबी, मग पुढे…
-सिनेमागृह सुरू करण्यास शासनाचा हिरवा कंदील, तरीही ‘लाल सिंग चड्ढा’ प्रदर्शनाची तारीख लांबणीवरच